पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात बिलोशी गावातील दुंदू तुकाराम पाटील यांचे कुटुंबीय झोपत असताना सकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली.
गावकऱ्यांनी त्यांना उठवून खिडकी मधून त्यांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली.
मात्र संपूर्ण घर जळून खाक झाले असून घरातील सर्वकाही जळून खाक झाले आहे.
दरम्यान आग नियंत्रनात अली असली तरी घरातील कपडे व अन्नधान्याचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी यांनी तात्काळ भेट देऊन पंचनामा केला आहे.