Marathi News Photo gallery WHO Global Air Quality Index: 99% of people in the world breathe in polluted air, what is the condition of India?
WHO Global Air Quality Index : जगातील 99 टक्के लोक घेतायत दूषित हवेत श्वास, भारताची स्थिती नेमकी कशी?
वायू प्रदूषणाशी लढण्यासाठी आपल्याला अनेक मोठे बदल करावे लागतील हे लक्षात आले आहे. भारतासह संपूर्ण जगाला इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. पेट्रोल, डिझेल आणि गॅस या जीवाश्म इंधनांचा वापर कमी करावा लागेल. याबरोबरच आपल्याला हरित ऊर्जेकडे वाटचाल करायची आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे.
1 / 9
पृथ्वीतलावर असलेल्या 797 कोटींहून अधिक असलेलया लोकांपैकी 99 टक्के लोक शुद्ध हवेचा श्वास घेत नाहीत. असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. जगभरातील 117 देशांमधील 6 हजारांहून अधिक शहरांमधील हवेच्या गुणवत्तेची तपासणी केल्यानंतर हा अनुमान काढण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. संपूर्ण जगात सर्वात मोठी समस्या सूक्ष्म कण आणि नायट्रोजन डायऑक्साइडची आहे. ही समस्या मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सर्वात जास्त आहे.
2 / 9
हवेचे प्रदूषण वाढतेय!
3 / 9
घाणेरड्या हवेमुळे केवळ आरोग्यावरच परिणाम होत असे नाही तर त्याचा परिणाम लोकांच्या कामावर होतो. या अभ्यासात PM2.5 आणि PM10 चे स्तर विशेषत: तपासले गेले आहेत. याशिवाय नायट्रोजन डायऑक्साइडचाही पहिल्यांदाच भूस्तरावर तपास करण्यात आला आहे. यापूर्वी असा अभ्यास 2018 मध्ये आला होता. नायट्रोजन डायऑक्साइड ची निर्मितीचे वाहनांतील इंधनामुळे होत आहे. शहरी भागात. त्यामुळे दम्यासारखे आजार झपाट्याने पसरत आहेत. लोक शिंकत राहतात. खोकला सुरु असतो. श्वास घेण्यास त्रास जाणवतात. पूर्व भूमध्य समुद्राच्या आसपासच्या देशांमध्ये त्याचे सर्वाधिक प्रमाण आहे.
4 / 9
डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार पीएम 2.5 इतका सूक्ष्म कण आहे जो तुमच्या फुफ्फुसात खोलवर जाऊ शकतो. ते तुमच्या रक्तात शिरू शकतात. ज्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित किंवा मेंदूशी संबंधित आजार होऊ शकतात. तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. किंवा ब्रेन स्ट्रोक देखील येऊ शकतो. दमा किंवा त्यासारखे आजार उद्भवत असतात.
5 / 9
WHO ने सहा महिन्यांपूर्वी जगभरातील हवेच्या गुणवत्तेबाबत नवीन आणि कठोर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. त्यानंतरही ही स्थिती आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार आम्ही केलेल्या अभ्यासात केवळ शहराचा समावेश नाही. यात आम्ही गावे आणि शहरांचा देखील अभ्यास केला आहे. मी खेडे आणि शहरांचाही अभ्यास केला आहे. आता तर लहान शहरे आणि खेड्यांमध्येही हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे. लोकांना या हवेत श्वास घेणे भाग पडले आहे. फुफ्फुसात विषाप्रमाणे पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) विरघळत आहे.
6 / 9
भूमध्यसागरीय देश, आग्नेय आशियाई देश आणि आफ्रिकेतील देशांमध्ये हवा प्रदूषणाची सर्वात वाईट परिस्थिती आहे. भारत, चीनसारख्या देशांमध्ये हवा प्रदूषणाची भयानक स्थिती आहे. डब्ल्यूएचओच्या पर्यावरण विभागाच्या प्रमुख डॉ. मारिया नीरा यांच्या म्हणण्यानुसार घाणेरडी हवा सहन होत नाही त्यामुळे दरवर्षी 70 लाख लोकांचा मृत्यू होतो.हे मृत्यूचे सत्र आपण थांबवू शकतो.
7 / 9
घाणेरड्या हवेमुळे केवळ आरोग्यावरच परिणाम होत असे नाही तर त्याचा परिणाम लोकांच्या कामावर होतो. या अभ्यासात PM2.5 आणि PM10 चे स्तर विशेषत: तपासले गेले आहेत. याशिवाय नायट्रोजन डायऑक्साइडचाही पहिल्यांदाच भूस्तरावर तपास करण्यात आला आहे. यापूर्वी असा अभ्यास 2018 मध्ये आला होता.
8 / 9
डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार पीएम 2.5 इतका सूक्ष्म कण आहे जो तुमच्या फुफ्फुसात खोलवर जाऊ शकतो. ते तुमच्या रक्तात शिरू शकतात. ज्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित किंवा मेंदूशी संबंधित आजार होऊ शकतात. तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. किंवा ब्रेन स्ट्रोक देखील येऊ शकतो. किंवा दमा किंवा त्यासारखे आजार उद्भवत असतात.
9 / 9
दिल्लीस्थित सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) वायू प्रदूषण तज्ज्ञ अनुमिता रॉयचौधरी यांच्या म्हणण्यानुसार या अभ्यासाने वायू प्रदूषणाशी लढण्यासाठी आपल्याला अनेक मोठे बदल करावे लागतील हे लक्षात आले आहे. भारतासह संपूर्ण जगाला इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. पेट्रोल, डिझेल आणि गॅस या जीवाश्म इंधनांचा वापर कमी करावा लागेल. याबरोबरच आपल्याला हरित ऊर्जेकडे वाटचाल करायची आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे.