IPL Mystery girl: आयपीएलमधल्या मिस्ट्री गर्लचा शोध लागला, DC vs KKR सामन्याच्यावेळी फोटो झाला होता व्हायरल
IPL Mystery girl: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत रोमांचक सामन्यांबरोबर ग्लॅमरस चेहरे सुद्धा लक्षवेधी ठरत आहेत. रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना झाला.
1 / 10
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत रोमांचक सामन्यांबरोबर ग्लॅमरस चेहरे सुद्धा लक्षवेधी ठरत आहेत. रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना झाला. यावेळी एक मिस्ट्री गर्ल चर्चेत आली होती.
2 / 10
टीव्ही स्क्रीनवर काही वेळासाठी ही मिस्ट्री गर्ल दिसली. काही वेळातच ही मिस्ट्री गर्ल सोशल मीडिया सेंसेशन बनली. ही मिस्ट्री गर्ल कोण आहे? जाणून घ्या...
3 / 10
दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स सामन्यादरम्यान एक झेल सुटला. त्यावेळी एक मुलगी काही वेळासाठी टीव्ही स्क्रीनवर दिसली.
4 / 10
तिचे एक्सप्रेशन व्हायरल झाले. ही मिस्ट्री गर्ल दुसरी-तिसरी कोणी नसून, अभिनेत्री आरती बेदी आहे.
5 / 10
आरती बेदी एक अभिनेत्री आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये याचा उल्लेख केला आहे. रविवारी डीसी आणि केकेआरमध्ये सामना सुरु होता.
6 / 10
त्यावेळी आरतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सातत्याने मॅचशी संबंधित अपडेट टाकल्या. पण तिचा फोटो व्हायरल झाल्यानंतर बरचं काही बदललं.
7 / 10
सामना सुरु होण्याआधी आरती बेदीचे इन्स्टाग्रामवर 30 हजार फॉलोअर्स होते. फोटो व्हायरल झाल्यानंतर फॉलोअर्सची संख्या 50 हजारच्या घरात गेली. आरती बेदीचे मीम्स आणि फोटो व्हायरल होत आहेत.
8 / 10
आरती बेदी सामना सुरु असताना केकेआरचे समर्थन करत होती. तिने अनेक जाहीरातींमध्येही काम केलं आहे. ICICI बँक, किंगफिशर सह अनेक ब्रँडसचा यामध्ये समावेश आहे.
9 / 10
IPL मधली ही नवी मिस्ट्री गर्ल तिच्या इन्स्टाग्रामवर फोटोशूट आणि ट्रॅव्हल्सशी संबंधित फोटो पोस्ट करत असते. आरती एक डान्सरही आहे. त्यामुळे ती सातत्याने वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्याचे फोटो पोस्ट करत असते.
10 / 10
आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत अनेक मिस्ट्री गर्ल्स व्हायरल झाल्या आहेत. सोशल मीडियाच्या या जमान्यात काही सेकंदासाठी जरी, तुम्ही टीव्ही स्क्रीनवर आलात, तरी ट्रेंडमध्ये येता.