राज कपूर यांचा नातू आणि रणबीर, करिश्मा आणि करीना यांचा चुलत भाऊ आदर जैन सध्या त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही वर्षांपासून तो अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. मात्र ब्रेकअपनंतर आदरने ताराचीच मैत्रीण आलेखा अडवाणीला डेट करण्यास सुरुवात केली.
नुकतंच आदरने आलेखाला लग्नासाठी प्रपोज केलंय. समुद्रकिनारी सजावट करून स्वप्नवत वाटावं अशा पद्धतीने त्याने आलेखाला प्रपोज केलंय.
आलेखा ही तारा आणि आदर या दोघांची खास मैत्रीण होती. एका जुन्या फोटोमध्ये तिने आदर आणि ताराच्या नात्यात 'थर्ड व्हिल' (तिसरी चाक) असल्याचं म्हटलं होतं.
आलेखा ही मुंबईतील उद्योजिका असून तिने डेलॉइट या कंपनीत हॉस्पिटॅलिटी सल्लागार म्हणून काम करत करिअरची सुरुवात केली. काही वर्षे लॉस एंजिलिसमधील डेलॉइटमध्ये काम केल्यानंतर आलेखा मुंबईत परतली.
आलेखा अडवाणी ही ‘वे वेल’ या मुंबईतील कम्युनिटीची संस्थापिका आहे. या कम्युनिटीअंतर्गत वेलनेस इव्हेंट्स, वर्कशॉप्स, सेशन्स आणि रिट्रीट्स आयोजित केले जातात. आलेखाने न्यूयॉर्कमधील कॉर्नेल हॉटेल स्कूलमधून पदवीचं शिक्षण घेतलंय.
आदर जैन हा राज कपूर यांचा नातू आहे. राज कपूर यांची मुलगी रिमा जैन यांचा तो मुलगा आहे. रणबीर कपूर, करीना आणि करिश्मा कपूर यांचा तो चुलत भाऊ आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा होती.