Marathi News Photo gallery Who is luv sinha shatrughan sinha son sonakshi sinha brother net worth property films political career
बहिणीच्याच सासऱ्यांविरोधात ट्विट करणाऱ्या लव सिन्हाची कोट्यवधींची संपत्ती
लव आणि त्याची आई पूनम सिन्हा यांच्या जॉईंट नावावर 1 कोटी 75 लाख रुपये किंमतीची एक रहिवासी इमारत गुरुग्राममध्ये आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार लव सिन्हावर कोणत्याही अपराधिक प्रकरणाची नोंद नाही.
1 / 6
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने 23 जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी स्पेशल मॅरेज अॅक्टअंतर्गत लग्न केलं. मात्र या लग्नाबद्दल सोनाक्षीच्या कुटुंबात नाराजी असल्याची चर्चा आहे. सोनाक्षीचा सख्खा भाऊ लव सिन्हाने केलेल्या काही ट्विट्सनंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
2 / 6
लव सिन्हाने सोनाक्षीच्या सासऱ्यांविरोधात एक पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्याने ती डिलिट केली. माझ्यासाठी हे प्रकरण संपलंय असंही त्याने म्हटलंय. तेव्हापासून लव सिन्हाबद्दल चर्चेला सुरुवात झाली आहे.
3 / 6
लव सिन्हा हा सोनाक्षीचा मोठा भाऊ आहे. त्याने वेबस्टर युनिव्हर्सिटीमधून 2004 मध्ये स्कूल ऑफ मास कम्युनिकेशनमधून पदवी संपादित केली आहे. लवने बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावलं होतं. 2010 मध्ये 'सदियाँ' या चित्रपटातून त्याने पदार्पण केलं होतं. याशिवाय तो जे. पी. दत्ता यांच्या 'पलटन'मध्येही झळकला होता.
4 / 6
2020 मध्ये लवने राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवलं. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्याने निवडणूकसुद्धा लढवली होती. बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून त्याने काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती. मात्र भाजपच्या नितीन नबिन यांनी त्याचा पराभव केला.
5 / 6
2020 मध्ये निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार लव सिन्हाकडे एकूण दोन कोटींची संपत्ती आहे. त्यावेळी त्याच्याकडे एकूण 75 लाखांची उधारीसुद्धा होती. लवने त्याच्या अॅफिडेविटमध्ये लिहिलं होतं की त्याच्याजवळ दोन लाखांपेक्षा अधिक रोख असून 26 लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा आहे.
6 / 6
2020 मध्ये त्याने 2 लाखांपेक्षा जास्त रुपये बाँड्स आणि शेअर्समध्ये गुंतवले होते. त्याच्याकडे जवळपास 4 लाख रुपयांची इन्शुअरन्स पॉलिसी आहे. तेव्हा त्याच्याकडे जवळपास साडेचार लाख रुपये किंमतीची इको स्पोर्ट्स कारसुद्धा होती.