गुजरातच्या रिया सिंघाने पटकावला ‘मिस युनिव्हर्स इंडिया’चा किताब; उर्वशीने घातला मुकूट

| Updated on: Sep 23, 2024 | 11:41 AM

विजेतेपद पटकावणारी रिया सिंघा ही गुजरातची असून ती उत्तम मॉडेलसुद्धा आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 40 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

1 / 5
गुजरातच्या रिया सिंघाने 'मिस युनिव्हर्स इंडिया 2024'चा किताब पटकावला आहे. रियाने इतर 51 स्पर्धकांना मागे टाकत अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय.

2 / 5
या विजयानंतर आता ती 'इंटरनॅशनल मिस युनिव्हर्स 2024' या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. रविवारी राजस्थानमधील जयपूर याठिकाणी ग्रँड फिनाले पार पडला होता.

3 / 5
या विजयाबद्दल रिया म्हणाली, "इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या मुकूटाच्या लायक बनण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले आहेत. याआधीच्या विजेत्यांकडून मला खूप प्रेरणा मिळाली."

4 / 5
या स्पर्धेत प्रांजल प्रिया दुसऱ्या क्रमांकावर होती, तर छवी वर्ग तिसऱ्या स्थानी होती. यावेळी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या हस्ते रियाला 'मिस युनिव्हर्स इंडिया'चा मुकूट घातला.

5 / 5
"यावर्षी भारत नक्कीच 'मिस युनिव्हर्स'चा मुकूट जिंकेल", असा विश्वास तिने यावेळी व्यक्त केला. उर्वशी या स्पर्धेतल्या परीक्षकांपैकी एक होती.