श्रद्धा कपूरपेक्षा वयाने लहान आहे तिचा बॉयफ्रेंड; कोण आहे राहुल मोदी?
गेल्या वर्षी मुंबईत डिनर डेटला गेल्यावरही त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर या वर्षी मार्च महिन्यात एका कार्यक्रमात श्रद्धाच्या गळ्यात ‘R’ या अक्षराचं पेंडंट पहायला मिळालं होतं. तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चांना आणखी उधाण आलं होतं.
1 / 5
गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टीची चर्चा होती, अखेर अभिनेत्री श्रद्धा कपूरने त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. श्रद्धाने मंगळवारी रात्री बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबतचा सेल्फी पोस्ट करून प्रेमाची जाहीर कबुली दिली. तेव्हापासून राहुल आहे तरी कोण, याविषयी जाणून घेण्यास नेटकरी आणि चाहते उत्सुक झाले आहेत.
2 / 5
राहुल मोदी हा पटकथालेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे. 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याची श्रद्धा कपूरशी भेट झाली. राहुलने याआधी 'प्यार का पंचनामा 2', 'सोनू के टिटू की स्वीटी' यांसारख्या चित्रपटांसाठी काम केलंय.
3 / 5
राहुल हा श्रद्धापेक्षा वयाने लहान असल्याचं कळतंय. त्याचं वय 34 वर्षे असून श्रद्धा कपूर ही 37 वर्षांची आहे. राहुलचं दिग्दर्शक सुभाष घई यांच्याशीही कनेक्शन आहे. कारण त्याने घई यांच्याच 'व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट'मधून पदवी प्राप्त केली.
4 / 5
राहुल आणि श्रद्धा कपूरने अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये सर्वांचं लक्ष वेधलं होतं. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी जामनगरमध्ये आयोजित केलेल्या प्री-वेडिंग कार्यक्रमामध्ये श्रद्धा राहुलसोबत पोहोचली होती.
5 / 5
श्रद्धाने मंगळवारी रात्री उशिरा तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये राहुल मोदीसोबतचा सेल्फी पोस्ट केला. त्यावर तिने लिहिलं, ‘दिल रख ले, नींद तो वापस दे दे यार’ (माझं हृदय तुझ्याकडे ठेव, पण झोप तरी परत दे). या कॅप्शनच्या पुढे तिने स्माइली आणि हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे.