'झी मराठी' वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. रक्षाबंधननिमित्त शिवा जगदीशकाकाच्या मुलाला घरी बोलावते. इकडे पाना गँगही शिवाला राखी बांधते.
किर्ती आशूकडून रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून शिवाला घरापासून दूर ठेव असं म्हणते. रामभाऊ आणि सिताई गिरनार दर्शनाला निघून जातात.
लक्ष्मण आणि उर्मिला हे आशू आणि शिवाला एकत्र वेळ घालवता यावा म्हणून कीर्ती आणि सुहासला फार्महाऊसवर घेऊन येतात. आशू आणि शिवा मिळून स्वयंपाक बनवतात.
शिवा आणि आशू सकाळी नाष्टा बनवत असताना सीताई आणि रामभाऊ येतात. आशूच्या हाताला भाजलेलं पाहून सिताई शिवावर ओरडते. शिवा आणि आशू मिळून लक्ष्मण आणि उर्मिला यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन प्लॅन करतात.
इकडे दहीहंडी जवळ येतेय, पण सिताई शिवाला दहीहंडीसाठी वस्तीत जायला नकार देते. शिवा गोपाळकाल्याच्या पूजेची तयारी एकटीच करते. पाना गँग शिवा दहीहंडीसाठी नसणार म्हणून उदास आहे.