प्रत्येक देशाचं आपलं स्वत:चं एक चलन असतं. जसं भारताचं चलन रुपया आहे. आपण आपले जवळपास सर्व आर्थिक व्यवहार हे रुपयांमध्येच करतो.
भारताच्या नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो आहे, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे.
मात्र तुम्हाला हे माहीत आहे का? की महात्मा गांधी यांचा फोटो नोटेवर येण्यापूर्वी दुसऱ्या एका व्यक्तीचा फोटो हा नोटेवर होता.
महात्मा गांधी यांच्या फोटोपूर्वी नोटेवर नेमका कोणाचा फोटो होता? तो व्यक्ती कोण होता हे आज आपण जाणून घेणार आहोत.
भारतीय चलनावर महात्मा गांधी यांचा फोटो येण्यापूर्वी नोटांवर ब्रिटनचा राजा जॉर्ज VI यांचा फोटो लावण्यात येत होता.
त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो फोटो हटवण्यात आला आणि त्याऐवजी अशोक स्तभांचा फोटो नोटांवर लावण्यात आला.
त्यानंतर 1996 साली आरबीआयनं महात्मा गांधी यांचा फोटो असलेल्या नोटांची सीरीज जारी केली, तेव्हापासून सर्व नोटांवर आता आपल्याला महात्मा गांधी यांचा फोटो दिसून येतो.