Photo : तब्बल 46 दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार, मंत्री, आमदारही सुरक्षित नाहीत
manipur imphal violence : मणिपूरमध्ये 46 दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. 16 जून रोजी म्हणजेच शुक्रवारी रात्रीही हिंसाचाराच्या 5 घटना घडल्या. या ठिकाणी सत्ताधारी भाजप आमदारांची घरे जाळली जात आहे.
1 / 5
मणिपूरमध्ये 3 मेपासून सुरू झालेला आहे. या हिंसाचारात तब्बल 46 दिवस उलटून गेले आहे. परंतु हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. 16 जून रोजी म्हणजेच शुक्रवारी रात्रीही हिंसाचाराच्या 5 घटना घडल्या. जमावाने इम्फाळ पश्चिम येथील इरिंगबम पोलिस स्टेशनवर हल्ला केला आणि शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षा दलांनी त्यांचा पाठलाग केला.
2 / 5
मणिपूर उच्च न्यायालयाने 19 एप्रिलला एका आदेशाद्वारे मैतेई समुदायाचा अनुसूचित जातीत समावेश करण्याचे निर्देश दिले. त्याला राज्यातील नागा तसेच कुकी या समुदायांनी आक्षेप घेतला आहे. त्यानंतर राज्यात हिंसाचार सुरु झाला.
3 / 5
मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिल्यास आमच्या अधिकारांवर गदा येईल असा दावा करत या मागणीला नागा तसेच कुकींनी विरोध केला आहे.
4 / 5
राज्यातील हिंसाचाराचा फटका भाजप आमदार विश्वजीत यांनाही बसला. त्यांच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या एका घटनेत खोंगमान आणि सिंजमाई येथील भाजपच्या कार्यालयांवर जमावाने हल्ला केला. इम्फाळच्या पोरमपेटमध्ये जमावाने भाजप महिला अध्यक्षा शारदा देवी यांच्या घराची तोडफोड केली. याशिवाय इंफाळमध्येच राजवाड्याच्या कंपाउंडला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
5 / 5
जमावाने भाजप खासदार आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांच्या इंफाळ येथील घराला आग लागली. गेल्या 20 दिवसांत मणिपूरमधील मंत्री आणि आमदारांच्या घरांवर हल्ल्याच्या 4 घटना घडल्या आहेत. 14 जून रोजी इंफाळमधील लामफेल येथील उद्योगमंत्री नेमचा किपजेन यांच्या अधिकृत बंगल्याला आग लागली होती. 8 जून रोजी भाजप आमदार सोरायसम केबी यांच्या घरावर बॉम्ब हल्ला झाला होता. यापूर्वी 28 मे रोजी काँग्रेस आमदार रणजित सिंह यांच्यावरही हल्ला झाला होता.