जगातील सर्वात मोठी रेल्वे कोच फॅक्टरी, बनवतात वंदे भारतसह 170 प्रकारचे कोच

| Updated on: Sep 20, 2024 | 3:20 PM

World Largest Rail Coach Factory, Chennai Integral Coach Factory: जगातील सर्वात मोठी रेल्वे कोच फॅक्टरी कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर अनेकांना माहीत नसले. परंतु रेल्वेचे डबे बनवणारा हा कारखाना भारतात आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नईत जगातील सर्वात मोठा रेल्वे कोच निर्मितीची कारखाना आहे.

1 / 5
चेन्नईमधील रेल्वेच्या कारखान्यात वंदे भारत ट्रेन, मेट्रो कोच, ईएमयू, डेएमयू, मेमू आणि इतर ट्रेन्सच्या सर्व डब्यांसह 170 प्रकारचे डबे तयार केले जातात. हा कारखाना केंद्र सरकारच्या म्हणजेच रेल्वे विभागाच्या अखत्यारीत आहे.

2 / 5
चेन्नई इंटिग्रल कोच फॅक्टरी हा जगातील सर्वात मोठा रेल्वे कोच बनवणारा कारखाना आहे. भारतीय रेल्वेच्या रेक उत्पादन युनिटपैकी चेन्नईमधील युनिट सर्वात जुने आहे. या ठिकाणी जून 2024 पर्यंत 75,000 रेल्वे डब्यांची निर्मिती झाली आहे. ज्यामध्ये वंदे भारत कोच डब्यांचाही समावेश आहे.

3 / 5
इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये दोन मुख्य विभाग आहेत. पहिला शेल विभाग आणि दुसरा फर्निशिंग विभाग आहे. शेल डिव्हिजनमध्ये 14 स्वतंत्र युनिट्स आहेत. जे एकत्रितपणे ट्रेनच्या डब्याची रचना करतात. कंपार्टमेंट तयार केल्यानंतर तो व्हील सेटवर ठेवला जातो.

4 / 5
फर्निशिंग डिव्हिजनमध्ये युनिट्स असतात. हे युनिट डिब्बेमधील फर्निशिंग, बाहेरची पेटींग, डब्बातील लाईट अशी इतर कामे करते. या कारखान्याचे उद्घाटन 1955 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. 2 ऑक्टोबर 1962 रोजी फर्निशिंग विभागाचे उद्घाटन करण्यात आले.

5 / 5
चेन्नई इंटिग्रल कोच फॅक्टरीचा बांधकाम खर्च त्यावेळी 7 कोटी 47 लाख रुपये आला होता. चेन्नई इंटिग्रल कोच फॅक्टरीतील रेल्वेचे डबे परदेशातही निर्यात केले जातात. प्रथम 1967 मध्ये थायलंडला निर्यात केली. 13 पेक्षा जास्त आफ्रिकन-आशियाई देशांमध्ये निर्यात केले गेले आहे.