मिहिर ज्या बारमध्ये प्यायला त्याच्यावर बुलडोझर… परवानाही रद्द; वरळीतील हिट अँड रन प्रकरणानंतर मोठी कारवाई

| Updated on: Jul 10, 2024 | 2:19 PM

वरळी हिट अँड रन प्रकरणी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने या बारच्या बेकायदेशीर भागावर कारवाई केली आहे.

1 / 10
मुंबई पोलिसांनी वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला तिसऱ्या दिवशी पोलिसांनी अटक केली.

2 / 10
आरोपी मिहीर याने अपघाताआधी मध्यरात्री जुहू येथे एका बारमध्ये पार्टी केल्याची माहिती समोर आली होती.

3 / 10
याच पार्श्वभूमीवर वरळी हिट अँड रन प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली होती. जुहूच्या व्हाईस ग्लोबल तपस बारला उत्पादन शुल्क विभागाने सील ठोकले होते.

4 / 10

आता मुंबई महापालिकेने जुहूच्या व्हाईस ग्लोबल तपस बारवर हातोडा मारला आहे. मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने या बारच्या बेकायदेशीर भागावर कारवाई केली आहे.

5 / 10
जुहूतील तपस बारवर मुंबई महापालिकेकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. या बारने अतिरिक्त पद्धतीने केलेल्या अवैध बांधकामावर पालिकेने कारवाई केली आहे.

6 / 10
तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जुहूतील या बारचा परवाना रद्द केला.

7 / 10
तसेच तपस बारचा परिसर सील करण्यात आले आहे. याप्रकरणी १९ जुलै रोजी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे.

8 / 10
परवानगी नसलेल्या भागात मद्यपान विक्री केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

9 / 10
मिहीर शहाचं वय २५ वर्ष नसतानाही त्याला हार्ड ड्रिंक दिलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे.

10 / 10
त्यामुळे या नियोजित सुनावणीचा निकाल येईपर्यंत बार उघडता येणार नसल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.