Year Ender 2023 : वर्षभरात चमकलं या सेलिब्रिटींचं करिअर; कोणत्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर दबदबा?
कोरोना महामारी आणि लॉकडाऊननंतर प्रेक्षक थिएटरकडे फिरकतील का असा प्रश्न अनेक चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना पडला होता. मात्र 2023 या वर्षभरात बॉक्स ऑफिसवर बऱ्याच चित्रपटांनी दमदार कामगिरी केली. काहींनी तर कमाईचा 500 कोटी रुपयांचा आकडा पार केला.
1 / 8
2023 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. या वर्षभरात बॉलिवूड इंडस्ट्रीत काही चित्रपटांनी भरभरून कमाई केली. या चित्रपटांमुळे काही सेलिब्रिटींनाही अच्छे दिन आले. बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई करणारे हे चित्रपट कोणते, ते पाहुयात..
2 / 8
ॲनिमल- हा चित्रपट या यादीत सर्वांत पहिल्या स्थानी येतो. कारण 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या सहा दिवसांत जगभरात कमाईचा 550 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.
3 / 8
पठाण- बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानने जवळपास चार वर्षांनंतर 'पठाण' या चित्रपटातून पुनरागमन केलं. किंग खानच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचले. या चित्रपटाने भारतात 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे.
4 / 8
जवान- या यादीत शाहरुख खानचाच आणखी एक चित्रपट आहे. 'जवान'मध्ये त्याने दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय केला. विशेष म्हणजे 'पठाण' आणि 'जवान' या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण झळकली.
5 / 8
गदर 2- सनी देओल आणि अमीषा पटेल ही सुपरहिट जोडी तब्बल 22 वर्षांनंतर 'गदर 2' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तारा सिंग आणि सकिनाच्या या कथेनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 500 कोटी रुपयांची कमाई केली.
6 / 8
टायगर 3- सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे सलमान आणि कतरिना कैफची हिट जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'टायगर 3' या चित्रपटाने आतापर्यंत 250 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे.
7 / 8
फुकरे 3- रिचा चड्ढा आणि पुलकित सम्राट यांच्या 'फुकरे 3' या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर आपला जलवा दाखवला आहे. फक्त 50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केलं आहे.
8 / 8
ओएमजी 2- अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या OMG 2 या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट सनी देओलच्या 'गदर 2'सोबतच प्रदर्शित झाला होता. तगडी टक्कर असतानाही बॉक्स ऑफिसवर अक्षयच्या चित्रपटाने 221.08 कोटी रुपये कमावले.