लग्नाच्या 5 महिन्यांतच ‘बिग बॉस मराठी 5’मध्ये जाण्याविषयी सासरचे काय म्हणाले? योगिताकडून खुलासा

| Updated on: Aug 14, 2024 | 2:12 PM

'जीव माझा गुंतला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री योगिता चव्हाण 'बिग बॉस मराठी 5'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. पाच महिन्यांपूर्वीच ती लग्नबंधनात अडकली होती. 'बिग बॉस मराठी' जिंकण्याचं मी काही प्लॅनिंग केलेलं नाही, मला फक्त मजा करत खेळायचं आहे, अशी भावना तिने व्यक्त केली.

1 / 5
कलर्स मराठी वाहिनीवरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण  नायिका म्हणून झळकली होती. सर्वगुणसंपन्न, हवीहवीशी वाटणाऱ्या तिच्या अंतरा या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. आता 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सिझनमध्येही तिचा चांगलाच बोलबाला आहे.

2 / 5
सातारकर असणाऱ्या योगिताचा जन्म ठाण्यात झाला आहे. नृत्यात करिअर करण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे 'मराठी बाणा' या कार्यक्रमात ती सहभागी झाली. इंडस्ट्रीत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून तिने काम सुरू केलं. पडद्यामागे काम करत सुरू झालेला तिचा प्रवास आता 'बिग बॉस मराठी'पर्यंत पोहोचला आहे.

3 / 5
'बिग बॉस मराठी'बद्दल बोलताना योगिता म्हणाली, "'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून योगिता काय आहे हे प्रेक्षकांना कळणार आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. 100 दिवस सोशल मीडिया आणि फोनपासून मी दूर असणार आहे."

4 / 5
कुटुंबीयांच्या प्रतिक्रियेविषयी सांगताना योगिता पुढे म्हणाली, "घरच्यांना 'बिग बॉस मराठी'मध्ये जाण्याबाबात सांगितलं तेव्हा सर्वच खूप आनंदी होते. सासरकडची मंडळीदेखील खूप समजूतदार आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात जा आणि लढ असं त्यांनी सांगितलं आहे."

5 / 5
"बिग बॉस मराठी'च्या घरात जाण्याआधी शेवटचा कॉल मी माझ्या बाबांना केला होता. 'बिग बॉस मराठी'च्या घरात एखादी व्यक्ती घेऊन जाण्यास परवानगी दिली तर मी माझ्या नवऱ्याला घेऊन जाईन. तो घरात माझा खूप चांगला सांभाळ करेल," अशी इच्छा योगिताने बोलून दाखवली.