Marathi News Photo gallery Fuel Price Hike Yuva Sena's cycle rally in Dombivali, Solapur, Pune against Petrol and diesel price hike
Photo : इंधन दरवाढीविरोधात युवासेनेचा एल्गार; पुणे, डोंबविली, सोलापूरसह राज्यभरात सायकल रॅली
देशात इंधन दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसचे दर वाढल्यामुळे गृहिणींचंही बजेट कोसळलं आहे. सरकारी मालकीच्या कंपन्या IOC, HPCL आणि bpcl यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35 पैशांची वाढ केलीय. त्यामुळे पेट्रोल 121 रुपये प्रतिलीटर तर डिझेल 112 रुपये प्रतिलीटरवर जाऊन पोहोचलं आहे. या पार्श्वभूमीवर युवासेनेनं राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे.
1 / 5

2 / 5
युवासेनेकडून आज राज्यभरात सायकल रॅली काढण्यात येत आहे. पुणे, सोलापूर आणि डोंबिवलीत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून सायकर रॅली काढण्यात येतेय.
3 / 5
पुण्यात युवा सेनेचे शेकडो कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. हेच का ते अच्छे दिन? असा सवाल पुण्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला विचारलाय.
4 / 5
सोलापुरातही आज युवा सेनेचे कार्यकर्ते सायकल घेऊन रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी सायकलवर भगवा झेंडा लावला होता. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
5 / 5
डोंबिवलीत इंधन दरवाढीविरोधातील सायकल रॅलीत शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यावेळी रॅलीत घोडा सहभागी करण्यात आला होता. तर बैलगाडीवर कार साकारण्यात आली होती. केंद्रातील भाजप सरकारविरोधात युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसंच