मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनल्यापासून हार्दिक पांड्याचे बुरे दिन सुरु झाले आहेत. हार्दिक पांड्याला सतत प्रत्येक स्टेडियमवर हूटिंगचा सामना करावा लागतोय. हा सर्व प्रकार एखाद्या प्लेयरच खच्चीकरण करण्यासाठी पुरेसा आहे.
हार्दिक पांड्याचे भले खराब दिवस सुरु असतील, पण टीम इंडियाच्या एका मोठ्या क्रिकेटपटूने हार्दिक पांड्याबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. त्याला विश्वास आहे की, हार्दिक पांड्या 6 चेंडूत 6 सिक्स मारु शकतो.
युवराज सिंह म्हणाला की, हार्दिक पांड्या तो फलंदाज आहे, जो T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये 6 चेंडूत 6 सिक्स मारु शकतो. सध्याच्या स्थितीत हार्दिक बद्दल असा विश्वास व्यक्त करणं मोठी गोष्ट आहे.
हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मध्ये बॅटिंग आणि बॉलिंग दोघांमध्ये फ्लॉप आहे. मुंबई इंडियन्सची टीम पॉइंट्स टेबलमध्ये 9 व्या स्थानावर आहे. 8 पैकी फक्त 3 सामने जिंकले असून 5 सामन्यात पराभव झाला आहे.
युवराज सिंह तो प्लेयर आहेत, ज्याने T20 वर्ल्ड कप 2007 मध्ये 6 चेंडूत 6 सिक्स मारले होते. T20 चा तो पहिलाच वर्ल्ड कप होता. इंग्लंड विरुद्ध युवराज सिंगने ही कामगिरी केली होती.