‘झी मराठी अवॉर्ड्स 2024’मधील त्या पुरस्काराने कलाकारांचेही डोळे पाणावले

| Updated on: Oct 25, 2024 | 1:03 PM

या सोहळ्याचे निवेदक संकर्षण आणि मृण्मयी यांनी सर्व कलाकारांसोबत सेल्फी घेत या जुन्या आठवणींना कॅमेरात बंदिस्त केलं. हा अविस्मरणीय सोहळा येत्या 26 आणि 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर पाहता येईल.

1 / 5
यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड 2024’ खऱ्या अर्थाने संस्मरणीय असणार आहे, कारण झी मराठी यंदा २५ वर्ष पूर्ण करत आहे. या कार्यक्रमात धमाकेदार परफॉर्मन्स असणार आहेतच, पण सोबत हृदयस्पर्शी आठवणींचा देखील समावेश असणार आहे. कार्यक्रम ऐन रंगात असताना घोषणा झाली ती एका अशा पुरस्काराची ज्याने उपस्थित कलाकारांचे डोळे पाणावले.

2 / 5
हा सन्मान कोणा व्यक्तीचा नसून तो एका मालिकेचा होता. ही तीच मालिका आहे जिच्या कलाकारांच्या आणि तंत्रज्ञांच्या यादीवर नजर टाकली तरी त्या मालिकेची श्रीमंती कळते. रात्री आठ वाजले रे वाजले की या मालिकेचं शीर्षकगीत घराघरातून कानावर पडायचं.

3 / 5
संध्याकाळी फक्त हिंदी मालिका लागायच्या अशा काळात ज्यांनी मराठीचा झेंडा रोवला आणि सगळ्यांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं, जिच्यावर लोकांनी अक्षरश: आभाळासारखी माया केली, ती मराठी खाजगी वाहिनीवरील पहिली मालिका म्हणजेच 'आभाळमाया'.

4 / 5
झी मराठी प्रमाणेच 'आभाळमाया' या मालिकेलाही पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी मालिकेची संपूर्ण टीम म्हणजेच सुकन्या कुलकर्णी – मोने , मनोज जोशी, सुबोध भावे, मुक्ता बर्वे, हर्षदा खानविलकर, मनवा नाईक, संजय मोने, उदय सबनीस, अरुण नलावडे, उमेश कामत, सोनाली खरे, राहुल मेहेंदळे, वैजयंती आपटे, मुक्ता बर्वे, प्रिया बापट, लेखक विवेक आपटे, दिग्दर्शक मंदार देवस्थळी, निर्माते अच्युत वाझे आणि सुबोध गाडगीळ मंचावर उपस्थित होते.

5 / 5
हा पुरस्कार घेताना सुकन्या मोने यांनी विनय आपटे आणि शुभांगी जोशी यांच्याशी असलेल्या नातेसंबंधांना उजाळा दिला. मालिकेचं शूटिंग म्हटलं की किस्से नाहीत असं होतच नाही. संजय मोने यांनी किस्से सांगायला सुरुवात केल्यावर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.