मोठी बातमी! राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार, ‘या’ जिल्ह्यातून सुरुवात; शहाजी बापू पाटील आणखी काय म्हणाले?

| Updated on: Nov 04, 2022 | 5:40 PM

ज्या घरात वाढलो तेच घर उध्वस्त करणे ही बेईमानी जनतेला पटलेली नाही. शिवसेना नाव आणि त्यांचे चिन्ह गोठवले तेही जनतेला रुचले नाही. जनतेचा प्रचंड राग एकनाथ शिंदे यांच्याबद्दल लोकांमध्ये आहे,.

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार, या जिल्ह्यातून सुरुवात; शहाजी बापू पाटील आणखी काय म्हणाले?
राष्ट्रवादीचे दोन आकडी नेते फुटणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सोलापूर: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे ठाकरे गटाच्या (thackeray camp) संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. शिरसाट यांनी आपण कुणाच्याही संपर्कात नसून शिंदे गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानंतरही शिरसाट यांच्या फुटीच्या चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते, आमदार शहाजी बापू पाटील (shahaji bapu patil) यांनी एक मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीचे (ncp) दोन आकडी नेते फुटणार आहे. ही फुटीची सुरुवात सोलापुरातून होणार आहे, असा गौप्यस्फोट शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात यासाठी बोललं जातंय कारण राष्ट्रवादीतील 12 नेते फुटलेले आहेत. पण ज्याचा त्याचा मुहूर्त ठरायचा आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोठ्यातील मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीला दणका बसणार आहे. सोलापुरातील हा नेता फुटणार आहे. जरा थांबा. ठरवून सगळं शिजवून झालेलं आहे. फक्त झाकण उघडायचे आणि वाढायचे आहे, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

तुम्ही काळाजी करू नका. नेत्याच्या हातात आता काही राहिलं नाही. सगळं पोरांनी केलंय. प्रत्येक गोष्ट राज्यात इथून पुढे ओकेचं होणार आहे. 170 आमदार शिंदे फडणवीस यांच्या पाठीमागे उभे आहेत. त्यामुळे कुणीही चिंता करायची गरज नाही, असंही ते म्हणाले.

आमच्या आमदारांना निधी मिळताना दिसत आहे. त्यामुळे सर्वच नेते खूष आहेत. आमचं सरकार मजबूत असून कामही चांगलं सुरू आहे. आमच्या सरकारची कुणी चिंता करू नये, असंही ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नेते, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. सत्तेवर आल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत. त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. जे पक्ष सोडून गेले ते आज अस्वस्थ आहेत तसे ते बोलून दाखवत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

ज्या घरात वाढलो तेच घर उध्वस्त करणे ही बेईमानी जनतेला पटलेली नाही. शिवसेना नाव आणि त्यांचे चिन्ह गोठवले तेही जनतेला रुचले नाही. जनतेचा प्रचंड राग एकनाथ शिंदे यांच्याबद्दल लोकांमध्ये आहे, असंही त्यांनी सांगितलं.