लोकसभा निवडणूक : तुमच्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. 11 एप्रिलपासून 19 मे या दरम्यान सात टप्प्यात देशभरात मतदान होणार आहे. यातील पहिल्या चार टप्प्यात म्हणजे 11 ते 29 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका पार पडतील. या पूर्ण निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 23 मे रोजी जाहीर होईल. काल (10 मार्च) निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. त्याचे इतिवृत्त […]

लोकसभा निवडणूक : तुमच्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. 11 एप्रिलपासून 19 मे या दरम्यान सात टप्प्यात देशभरात मतदान होणार आहे. यातील पहिल्या चार टप्प्यात म्हणजे 11 ते 29 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका पार पडतील. या पूर्ण निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 23 मे रोजी जाहीर होईल. काल (10 मार्च) निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. त्याचे इतिवृत्त तुम्ही ‘टीव्ही 9 मराठी’वर पाहिले आणि वाचले असालच, मात्र आता आम्ही एकाच ठिकाणी या निवडणुकीच्या महत्त्वाच्या बातम्या देत आहोत.

पहिली बातमी : लोकसभा निवडणूक 2019 : प्रचार, मतदान ते निकाल, A टू Z माहिती

दुसरी बातमी : तुमच्या मतदारसंघात कधी मतदान? पाहा इथे

तिसरी बातमी : राज्याचं लक्ष लागलेले 10 मतदारसंघ आणि त्यांच्या निवडणुका

चौथी बातमी : महाराष्ट्रातील सद्यस्थिती, कुठल्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा खासदार? 

पाचवी बातमी : तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? इथे चेक करा

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.