अहमदनगर – घर खाली करण्यासाठी घरात जबरदस्ती प्रवेश करून मारहाण एका कुटुंबियाला केल्याप्रकरणी भाजपच्या (BJP) नगरसेवका (Corporator) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवकाचे नाव स्वप्नील शिंदे (Corporator Swapnil Shinde) आहे. स्वप्नील शिंदेसह सात जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडा, खंडणी आणि विनयभंग आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. तक्रारदार व्यक्तीला 11 मार्च रोजी रात्री शिंदे, बुलाखे आणि इतरांनी प्रवेश करून घर खाली करण्यासाठी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत घरातील ‘सामानाची तोडफोड केली. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत.
संभाजी रोडवरील एका व्यक्तीने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सात जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 मार्चला रात्री नगरसेवक स्वप्निल शिंदे त्यांच्या साथीदारांसोबत घरी आले. त्यावेळी त्यांनी कुटुंबियांना घर खाली करण्यास सांगितले. कुटुंबियांनी नकार दिल्याने सोबत आणलेल्या व्यक्तींनी कुटुंबियांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कुटुंबियांना शिवीगाळ करीत मारहाण देखील केली. 11 मार्चला नगरसेवकांशी कुटुंबियांना त्यांच्या कार्यालयात बोलवून मारहाण देखील केली आहे. या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी सुध्दा दिली असल्याचा आरोप केला आहे.
झालेल्या प्रकरणाची तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी फिर्यादीकडून सगळी माहिती घेतली आहे. पोलिस स्वप्नील शिंदे यांची कसून चौकशी करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.