नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या आजच्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी निघत असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अडवण्यात आले आहे. त्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपच्या इशाऱ्यावरूनच केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर, आम आदमी पक्ष केवळ शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. (AAP Says Cm Arvind Kejriwal Under House Arrest, Delhi Police Denies Claim)
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरालाच तुरुंग बनवण्यात आल्याचा आरोप उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी केला आहे. केजरीवाल यांनी पोलिसांना शेतकऱ्यांसाठी तुरुंग बनविण्यापासून रोखलं. त्यामुळे केजरीवाल यांचं घरच तुरुंग बनविण्यात आलं आहे, असा आरोप सिसोदिया यांनी केला आहे. केजरीवाल यांना घरातच नजरकैदेत ठेवलेले नाही तर मग आपच्या कार्यकर्त्यांना दिल्लीत का रोखले जात आहे?, असा सवालही त्यांनी केला आहे.
आंदोलक शेतकऱ्यांना तुरुंगात डांबण्याचे पोलिसांचे मनसुबे केजरीवाल यांनी उधळून लावले. त्यामुळे पोलीस घाबरले. केजरीवाल आंदोलन स्थळी जाऊ नये म्हणून घाबरलेल्या पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.
डीसीपी अँटो अल्फान्सो यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं मान्य केलं आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी नियमित ठेवण्यात असलेला हा ताफा आहे. आम्ही सीएम निवासस्थानाच्या सुरक्षेची काळजी घेत आहोत. त्यामुळे ज्यांना कुणाला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे, असं अल्फान्सो यांनी सांगितलं. (AAP Says Cm Arvind Kejriwal Under House Arrest, Delhi Police Denies Claim)
सिंधू बॉर्डरवरून आल्यापासूनच मुख्यमंत्री केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा आपचे आमदार राघव चढ्ढा यांनी केला आहे. तर सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भारद्वाज यांनी एकावर एक अनेक ट्विट करून भाजपला घेरले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांना जर नजरकैदेत ठेवलं जात आहे, तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग खुले आम कसे फिरत आहेत? त्यांना नजरकैदेत का ठेवलं नाही? असा सवाल भारद्वाज यांनी केला आहे.
Why is @ArvindKejriwal in house arrest while @capt_amarinder is free? pic.twitter.com/jttGFT9x3S
— Saurabh Bharadwaj (@Saurabh_MLAgk) December 8, 2020
भाजपचे नेते आणि खासदार गौतम गंभीर यांनी ट्विट करून केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांना शेतकऱ्यांशी काही घेणंदेणं नाही. शेतकरी केवळ बहाना असून त्यांना पंजाबच्या राजकारणात आपला मजबूत करायचे आहे. स्वत:च स्वत:ला घरात कोंडून घेऊन नजरकैदेत असल्याची ते बोंब मारत आहेत. हा प्रकार केवळ केजरीवालच करू शकतात, असा टोला गंभीर यांनी लगावला आहे. भाजपनेही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. केजरीवाल आणि त्यांच्या गँगने पुन्हा एकदा खोटं बोलण्यास सुरुवात केली आहे, अशी टीका भाजपने केली आहे. (AAP Says Cm Arvind Kejriwal Under House Arrest, Delhi Police Denies Claim)
किसान तो सिर्फ बहाना है, पंजाब की सियासत में आना है!
खुद ही घर में बंद होकर हाउस अरेस्ट चिल्लाना, ये सिर्फ @ArvindKejriwal कर सकते हैं
— Gautam Gambhir (@GautamGambhir) December 8, 2020
भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांनी केजरीवाल खोटे बोलत असून ते आपल्या जबाबदाऱ्यांवरून पळ काढत असल्याचा दावा केला आहे. तर, केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचा खोटारडेपणा जनतेसमोर आल्याची टीका भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी केला आहे.
Liar @AamAadmiParty stands exposed!
@ArvindKejriwal ji go out of your home and Meet the MCD mayors and release funds of MCD.. rise above politics and stop lying to Delhi.@BJP4Delhi @AnamikaMBJP @JPBhaiBJP #NirmalJain @hdmalhotra https://t.co/fbmDYw9HP6— Office Of Manoj Tiwari (@ManojTiwariOffc) December 8, 2020
संबंधित बातम्या:
भारत_बंद – महाराष्ट्रातील Live Updates | महाविकास आघाडीतर्फे वाशीत निदर्शने
BHARAT BAND | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नजरकैदेत! दिल्लीतील आजची स्थिती काय?
(AAP Says Cm Arvind Kejriwal Under House Arrest, Delhi Police Denies Claim)