राजीव गांधींचा ‘भारतरत्न’ मागे घेण्याचा प्रस्ताव दिल्लीत मंजूर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार मागे घेण्याचा प्रस्ताव आपशासित दिल्ली विधानसभेत मंजूर झाला आहे. 1984 मधील शीखविरोधी दंगलीप्रकरणी राजीव गांधींचा भारतरत्न पर घेण्याच्या प्रस्तावाला दिल्ली विधानसभेत मंजुरी मिळाली. मात्र  हा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती आप आमदार अलका लांबा यांनी सोशल मीडियावर जाहीर केल्यानंतर, आपमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. अलका लांबा यांचा […]

राजीव गांधींचा भारतरत्न मागे घेण्याचा प्रस्ताव दिल्लीत मंजूर
Follow us on

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार मागे घेण्याचा प्रस्ताव आपशासित दिल्ली विधानसभेत मंजूर झाला आहे. 1984 मधील शीखविरोधी दंगलीप्रकरणी राजीव गांधींचा भारतरत्न पर घेण्याच्या प्रस्तावाला दिल्ली विधानसभेत मंजुरी मिळाली. मात्र  हा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती आप आमदार अलका लांबा यांनी सोशल मीडियावर जाहीर केल्यानंतर, आपमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. अलका लांबा यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. इतकंच नाही तर आपचे प्रवक्ते सोमनाथ भारती यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

सोमनाथ भारती यांना प्रवक्ते पदावरुन हटवण्यात आलं आहे. आपणच हा प्रस्ताव दिला होता, असा दावा सोमनाथ भारती यांनी केला आहे. राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घ्यायला हवा, असा हा प्रस्ताव होता.

आम आदमी पक्षातील सूत्रांनुसार अलका लांबा यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यांचं पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहेच, शिवाय आमदारपदाचाही राजीनामा घेण्यात आला आहे.

राजीव गांधींविरोधातील उठावाला अलका लांबा यांचा विरोध होता. अलका लांबा यांनी पक्षविरोधी भूमिका घेत, सोशल मीडियावर याबाबतचं भाष्य केल्याने पक्षनेतृत्त्व त्यांच्यावर नाराज होतं.

आपल्यावर प्रस्तावाचं समर्थन करण्यास दबाव होता, त्यामुळे मी विधानसभेतून वॉकआऊट अर्थात बाहेर पडले, असं अलका लांबा यांनी सांगितलं. शिवाय आपण कारवाईसाठीही तयार असल्याचं म्हटलं.

दरम्यान, सोमनाथ भारती यांच्या दाव्यानुसार, राजीव गांधींबाबत दिल्ली विधानसभेत जो प्रस्ताव वादात आहे, तो मूळ प्रस्तावाचा भाग नव्हता. मी स्वत: ही लाईन त्यामध्ये अॅड केली होती.

काँग्रेसचा हल्लाबोल

दरम्यान, दिल्ली विधानसभेतील प्रस्तावावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली. राजीव गांधी यांनी देशासाठी आपला जीव दिला. या प्रस्तावामुळे आम आदमी पक्षाचा खरा चेहरा समोर आला आहे, असं दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी सांगितलं. आम आदमी पार्टी ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे, असा घणाघातही माकन यांनी केला. 

आप नेत्याचं स्पष्टीकरण

दुसरीकडे आप आमदार सौरभ भारद्वाज यांनी हा प्रस्ताव पारित झाला नाही, असं ट्विट केलं आहे. हा व्यक्तीगत प्रस्ताव होता, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असं त्यांनी नमूद केलं.