BREAKING : ठरलं! दीपाली सय्यद शिंदे गटातच जाणार, महत्त्वाची माहिती समोर

| Updated on: Nov 12, 2022 | 10:21 PM

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या, अभिनेत्री दीपाली सय्यद उद्या अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत.

BREAKING : ठरलं! दीपाली सय्यद शिंदे गटातच जाणार, महत्त्वाची माहिती समोर
Follow us on

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आलीय. ठाकरे गटाच्या नेत्या, अभिनेत्री दीपाली सय्यद उद्या अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. दीपाली सय्यद यांनी स्वत: याबाबत अधिकृत माहिती दिलीय. दीपाली उद्या दुपारी एक वाजता ठाण्यातील कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

दीपाली सय्यद यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “मला ठाण्यात निवडणूक लढवण्याची संधी मिळेल का याबाबत आणि सर्व प्रश्नांवर मी उद्या सविस्तर भूमिका मांडेन. एकनाथ शिंदे यांनी मला शिवसेनेत आणलं होतं. मी शिवसेनेतच शिंदेंबरोबर आहे”, असं दीपाली सय्यद यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. उद्धव ठाकरेंनी दोन पावलं मागे यायला हवं होतं. ते मागे आले असते तर काहीतरी झालं असतं. पण ते मागे आले नाहीत. देव करो आणि भविष्यात तरी ते एकत्र येवो”, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

“मी सामान्य कार्यकर्ता आहे. त्यांनी एकत्र यावं असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय. पण गोष्टी आता इतक्या पुढे गेल्या आहेत की काही सांगता येणार नाही. प्रत्येकाला काम करायचं आहे. त्यापद्धतीने प्रत्येकजण चाललेलं आहे. तसंच आहे. काय होतं ते पाहुयात”, अशी प्रतिक्रिया दीपाली सय्यद यांनी दिली.