मुंबई : “महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही. मराठीच्या गौरवाला ज्यांनी प्रतिष्ठित केलं, महाराष्ट्र त्यांचाच आहे. मी मराठा आहे आणि हे मी निक्षूणपणे सांगते. जे करायचंय ते करा”, असा इशारा अभिनेत्री कंगना रनौतने (Actress Kangana Ranaut) ट्विटरवर दिला आहे.
अभिनेत्री कंगना रनौतने (Actress Kangana Ranaut) मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सर्वच स्तरावरुन तिच्यावर टीकेची झोड उठत आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस, मनसे या पक्षांनी कंगनाला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीने तर कंगनाचा फोटो असलेल्या पोस्टरवर जोडो मारो आंदोलन केलं. त्यानंतर कंगनाने ट्विटरवर शिवसेनेवर नाव न घेता निशाणा साधला.
किसी के बाप का नहीं है महाराष्ट्र, महाराष्ट्र उसी का है जिसने मराठी गौरव को प्रतिष्ठित किया है। और मैं डंके की चोट पे कहती हूँ हॉ मैं मराठा हूँ ,उखाड़ो मेरा क्या उखाड़ोगे? pic.twitter.com/MVvyiXiLzc
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 4, 2020
“यांची लायकी नाही. गेल्या 100 वर्षात मराठ्यांचा इतिहास सांगणारा एकही चित्रपट तयार केला नाही. मी इस्लाम डॉमिनेटेड इंडस्ट्रीमध्ये माझा जीव आणि करिअर पणाला लावलं. छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट बनवला. आज महाराष्ट्राच्या ठेकेदारांना विचारा त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?”, असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे.
इनकी औक़ात नहीं है, इंडस्ट्री के सौ सालों में एक भी फ़िल्म मराठा प्राइड पे बनाई हो,मैंने इस्लाम डॉमिनेट इंडस्ट्री में अपनी जान और करीयर को दाओ पे लगाया, शिवाजी महाराज और रानी लक्ष्मीबाई पे फ़िल्म बनाई, आज महाराष्ट्र के इन ठेकेदारों से पूछो किया क्या है महाराष्ट्र केलिए ? pic.twitter.com/o9kk5OpSba
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 4, 2020
“हिंदी चित्रपटसृष्टीत मी सर्वातआधी छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट तयार केला आहे, हे चापुलसी करणारे, महाराष्ट्राप्रती प्रेम असणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. मी चित्रपट तयार केला त्यावेळीदेखील या लोकांनी मला विरोध केला होता”, असं कंगना म्हणाली.
All chaploos who are showing their love for Maharashtra must know I am the first Actor/ Director in the history of Hindi Cinema to bring Maratha Pride Shiva Ji Maharaj and Rani LaxmiBai to the big screen and I faced huge opposition during the relase from the same people ? https://t.co/HMzDMcpdwQ
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 4, 2020
कंगना यावरच थांबली नाही. तिने यापुढेही ट्विट सुरुच ठेवले. “एका महान पित्याचा पुत्र होणं, हे एकमेव कतृत्व होऊ शकत नाही. मला महाराष्ट्राच्या प्रेमाचे किंवा द्वेषाचे प्रमाणपत्र देणारे तुम्ही कोण? तुम्ही माझ्यापेक्षा महाराष्ट्रावर जास्त प्रेम करता हे तुम्ही कसे ठरवले? आता मला तिथे येण्याचा अधिकारही नाही?”, असे सवाल कंगनाने उपस्थित केले.
एक महान पिता की संतान होना ही आपकी एक मात्र उपलब्धि नहीं हो सकती, आप कौन होते हैं मुझे महाराष्ट्र प्रेम या नफ़रत का सर्टिफ़िकेट देने वाले ? आपने यह कैसे निर्धारित कर लिया की आप महाराष्ट्र को मुझसे ज़्यादा प्रेम करते हैं? और अब मुझे वहाँ आने का कोई हक़ नहीं? #ShameOnMahaGovt pic.twitter.com/XOB2vzaNYL
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 4, 2020
संबंधित बातम्या :
कंगनाचं एअरपोर्टवर मनसे स्टाईल स्वागत होईल, असं वाटत असेल तर… : अमेय खोपकर
फडणवीस हे कंगना आणि राम कदमांचे बोलवते धनी, कदमांची नार्को टेस्ट करा : सचिन सावंत
“उचलली जीभ…” मुंबईची PoK शी तुलना, कंगनाला रेणुका शहाणेंनी सुनावलं
“बाईसाहेब मुंबईत पर्यटनासाठी आला होता का?’ नितीन राऊतांचा कंगनाला सवाल
“मुंबईत परत पाऊल ठेवू नकोस” संजय राऊतांनी उघड धमकी दिल्याचा कंगनाचा गंभीर आरोप
आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, निलेश राणेंनी कंगनाला बजावले