‘ते’ ट्विट का डिलीट केलं?, आदित्य ठाकरेंनी दिलं ‘हे’ कारण!

| Updated on: Apr 28, 2021 | 4:53 PM

राज्यात मोफत लसीकरण होणार असल्याचं ट्विट करून ते ट्विट राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी डिलीट केलं होतं. (aditya thackeray clarification on deleted tweets)

ते ट्विट का डिलीट केलं?, आदित्य ठाकरेंनी दिलं हे कारण!
Aditya Thackeray
Follow us on

मुंबई: राज्यात मोफत लसीकरण होणार असल्याचं ट्विट करून ते ट्विट राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी डिलीट केलं होतं. त्यावरून विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. आदित्य यांनी आता ते ट्विट का डिलीट केलं होतं, याचा खुलासा केला आहे. (aditya thackeray clarification on deleted tweets)

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी नवं ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी डिलीट करण्यात आलेल्या ट्विटवरही भाष्य केलं आहे. तीन दिवसांपूर्वी मी माझं ट्विट डिलीट केलं होतं. कोणताही संभ्रम किंवा गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून मी ट्विट डिलीट केलं होतं. आता मंत्रिमंडळाने मोफत लसीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही बातमी शेअर करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं आदित्य यांनी म्हटलं आहे.

लसीकरण लवकर होईल

राज्यातील नागरिकांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनाच्या संकटातून नागरिकांचं संरक्षण व्हावं म्हणून कर्तव्य म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. लवकरात लवकर ही लसीकरण मोहीम वेगाने पूर्ण करण्यात येईल, असं आदित्य यांनी स्पष्ट केलं आहे.

काय होतं आधीचं ट्विट

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून मोफत लसीकरणावर भाष्य केलं होतं. राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमचं कर्तव्य म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आलं होतं. त्यामुळे विरोधकांनी आदित्य यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

पडळकर काय म्हणाले?

आदित्य यांनी ट्विट डिलीट केल्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर टीका केली होती. बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘वाटाघाटीʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मोफत लसीकरण करण्याचं ट्विट केलं. ते ऐकून खूप आनंद झाला. पण काही वेळातच त्यांनी ट्विट डिलीट केलं. महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा निर्णय त्यांनी मागे घेऊ नये, असं पडळकर म्हणाले होते. (aditya thackeray clarification on deleted tweets)

 

संबंधित बातम्या:

राज्यात 1 मे पासून लसीकरण होणार नाही, राजेश टोपे यांचं मोठं विधान

Maharashtra lockdown | महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवावाच लागेल- राजेश टोपे

टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांनी आता आदित्य ठाकरेंना डिवचले

(aditya thackeray clarification on deleted tweets)