Aditya Thackeray | दिवाळीत वर्षावर पोटभर जेवून गेले आणि गद्दारी केली, जळगावात आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका

| Updated on: Aug 20, 2022 | 5:43 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते, 33 देशांनी आमच्या बंडाची नोंद घेतली आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. 33 देशांनी तुमच्या गद्दारीची नोंद घेतली आहे. थोडी

Aditya Thackeray | दिवाळीत वर्षावर पोटभर जेवून गेले आणि गद्दारी केली, जळगावात आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका
पाचोरा येथील सभेत बोलताना आदित्य ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगावः दिवाळीत वर्षा बंगल्यावर पोटभर जेवून गेले आणि गद्दारी केली. पण त्यावेळी सगळे शिवसेना आमदार मुखवटा घालून फिरत होते, कुणावरही संशय आला नाही, अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली. एकनाथ शिंदे गटात गेलेले आमदार गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी आज शिवसेना मेळावा घेतला. या मेळाव्याला हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यासह शिंदे (CM Eknath Shinde) गटातील आमदारांनी गद्दारी करून शिवसेना प्रमुखांना फसवल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. जळगावात जमलेल्या शिवसैनिकांना उद्देशून ते म्हणाले, या गद्दारांकडे लक्ष देऊ नका. मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असे भावनिक आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.

‘गद्दार विकाऊ, पण जनता प्रामाणिक’

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सध्या चौथा टप्पा सुरु आहे. जळगाव येथील पाचोऱ्यात त्यांनी जनतेशी संवाद साधला. भर पावसात सभेसाठी जमलेल्या लोकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘ महाराष्ट्रात शिवसेनेला संपवण्याचा कट रचला जातोय , आम्हाला एकटे पाडण्याचा. पण तुम्ही आम्हाला एकटे पडू द्याल का? महाराष्ट्रातली जनता सूज्ञ आहे. शिवसेनेशी गद्दारी झाली. गद्दार जरी विकाऊ असले तरी जनता प्रामाणिक आहे. विकास कामं कोण करतं, कोण खोटं बोलतं हे त्यांना ठाऊक आहे, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं.

‘सत्तामेव जयते नव्हे, सत्यमेव जयतेलाच महत्त्व’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, जनतेला सर्व माहिती आहे. देशात सत्यमेव जयतेला महत्त्व आहे, फक्त सत्तामेव जयते ला नव्हे… त्यामुळे हे गद्दारांचं बेकायदेीर सरकार लवकरच कोसळणार…

’33 देशांनी गद्दारीची नोंद घेतली’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते, 33 देशांनी आमच्या बंडाची नोंद घेतली आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. 33 देशांनी तुमच्या गद्दारीची नोंद घेतली आहे. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर राजीनामे देऊन निवडणुकांना सामोरे जा, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं. सरकार गेल्याचं दुःख आम्हाला नाही. ते तुम्ही परत आणाल. पण महाराष्ट्राच्या प्रगतीचं काम यांनी रोखलं. कोविड काळात जनतेचे जीव वाचवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. जगानेही याचं कौतुक केलं. पण महाराष्ट्र पुढे गेला तर काय होईल, यामुळे त्यांच्या पोटात दुखत असेल. देशात आपलं नाव होत होतं, तेच त्यांच्या पोटात दुखत होतं, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर टीका केली.