Eknath Khadse | अजित पवार यांच्या शपथविधीनंतर एकनाथ खडसे अस्वस्थ, पुढील भूमिका करणार स्पष्ट?

| Updated on: Jul 02, 2023 | 6:59 PM

अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. फक्त अजित पवार हेच नाही तर अनेक नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ ही घेतली आहे. यानंतर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यावर शरद पवार यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Eknath Khadse | अजित पवार यांच्या शपथविधीनंतर एकनाथ खडसे अस्वस्थ, पुढील भूमिका करणार स्पष्ट?
Follow us on

मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकारणाला वेग आल्याचे बघायला मिळत आहे. मोठ्या घडामोडी या राज्यात घडत आहेत. अनेक नेत्यांनी आता मुंबईकडे (Mumbai) येण्यास सुरूवात केलीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी मोठे खुलासे केले. इतकेच नाही तर शरद पवार यांनी काही नेत्यांवर जाहिरपणे नाराजी देखील व्यक्त केली. यामध्ये प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचे नाव आहे. कारण काही दिवसांपूर्वीच प्रफुल पटेल यांना शरद पवार यांनी अत्यंत मोठी जबाबदारी दिली होती. शरद पवार यांनी अनेक गोष्टींवर भाष्य देखील केले आहे.

राज्यामध्ये या सर्व घडामोडी घडत असतानाच आता जळगाववरून देखील मोठी बातमी पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आजच्या दिवसभराच्या राजकीय घडामोडी माैन बाळगल्याचे दिसले. अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबद्दल एकनाथ खडसे यांना प्रश्न विचारण्यात आला.

नुकताच एकनाथ खडसे हे उद्या मुंबईला जाणार असल्याचे कळत आहे. मात्र, त्यांनी अजित पवार यांच्या शपथविधीवर भाष्य करणे टाळले. काहीही न बोलता खडसे हे निघून गेले. मी उद्या मुंबईला जाणार आहे त्यानंतर मी सविस्तर तुमच्याशी बोलेन असे यावेळी खडसे म्हणाले. आता एकनात खडसे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

एकनाथ खडसे हे काही वर्षांपूर्वीच भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. इतकेच नाही तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही आरोप देखील केले होते. त्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्याने एकनाथ खडसे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गिरीष महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामधील वाद सर्वांनाच माहिती आहे.

बऱ्याच वेळा एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहिरपणे टिका करताना देखील दिसतात. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी थेट मोठा दावा करत म्हटले की, राज्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक निडणूका आम्ही लढणार आहोत. विशेष म्हणजे अजित पवार यांनी स्पष्ट केले की, सर्व निडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवणार आहोत.