“नवनिर्वाचित गटनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा. या निवडणुकीत महाराष्ट्रातील 14 कोटी जनता जर्नादनचा निर्णय हा संपूर्ण भारतासाठी संदेश आहे. ही नियमित विधानसभा निवडणूक नव्हती. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील ही निवडणूक त्याआधी हरियाणाची निवडणूक यातून जनतेचा संदेश स्पष्ट आहे. हे अभूतपूर्व यश हा विकसित भारतासाठी संदेश आहे” असं निर्मला सीतारमण म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेता निवडीसाठी निरीक्षक म्हणून मुंबईत आल्या आहेत. विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांनी भाषण केलं.
“लोकांनी त्यांच्या अनुभवानुसार काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सरकार त्यामुळे महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाच्या कामात व्यत्यत आला होता. त्यामुळे लोक वैतागले होते. त्यामुळे राज्यात काय चाललंय असं लोकांच्या मनात होतं. त्यामुळेच त्यांनी हा कौल दिला आहे. त्यामुळे हा कौल तुम्ही योग्य पद्धतीने पुढे न्याल. डबल इंजिनचं सरकार मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या भविष्यासाठी पुढे न्याल” असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.
स्टार्टअपसाठी मोठं योगदान
“निवडणुकीतील घोषणा तुम्ही पूर्ण कराल. राज्यातील काँग्रेसच्या काळातील सरकारमध्ये जनतेचं कसं नुकसान झालं हे लोकांना दाखवून आपल्याला पुढे जायचं आहे. शेतकरी, उद्योग आणि कोणत्याही क्षेत्रातील कामे असतील ती पुढे न्यायची आहेत. एआयमध्ये आपले तरुण स्टार्टअपसाठी मोठं योगदान देत आहेत. त्यांना महाराष्ट्रात आणखी प्रोत्साहन मिळालं पाहिजे. मुंबई आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे स्टार्टअपमध्ये आपण मोठं योगदान देऊ शकतो” असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.