मुंबई : “इलेक्शन कमिशन 2019 वर का जातय? कारण इलेक्शन कमिशनला लक्षात आलय की, जर 30 तारखेच पत्र ग्राहय धरलं, तर 2 तारखेचे घोटाळे पक्ष विरोधी कारवाया ठरतात. 30 तारखेला सही केली असली तरी पक्ष विरोधी कृती ठरते. त्यातून सुटण्यासाठी कमिशनने 2019 चा मार्ग पकडलाय. इलेक्शन कमिशनच्या नाऱ्याला काहीही अर्थ उरलेला नाही. हे सर्व कोर्टात जाईल” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “इलेक्शन कमिशन कठपुतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पर्याय विचारले. राष्ट्रवादी वाढवण्यात कोणाचा सहभाग होता? रक्त आणि आयुष्य कोणी दिलं? याच उत्तर आहे शरद पवार” असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
“जजमेंटमध्ये म्हटलय आम्ही पर्याय मागितले, पणे ते त्यांनी दिलेच नाहीत. आम्ही पर्याय दिले. आमच्याकडे पत्र आहे. इलेक्शन कमिशन खोट बोलतय की, ते विसरभोळे आहेत?. हा निर्णय संशयास्पद आहे. निवडणूक आयोगाने घोटाळे करुन ठेवलेत” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. राष्ट्रवादीला रक्त आणि जीवन, ह्दयाची धडधड कोणी चालू ठेवली? अपात्रतेचा निर्णय होत नाही, तो पर्यंत कुठलाही निर्णय अनपेक्षित आहे. असं काही होण संविधानाच्या विरोधात आहे” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
भावना किती दुखावल्या गेल्यात हे आयोगाला नाही माहीत
“हा शरद पवारांना संपवण्याचा, त्यांची राजकीय हत्या करण्यासाठी रचलेला मोठा कट आहे. आम्ही पर्याय दिले होते. तुम्ही त्या पर्यायांचा उल्लेखच केला नाहीय. तुम्ही तुम्हाला हवी तशी टायपिंग करुन घेतली आहे. इलेक्शन कमिशनसारखी महत्त्वाची संस्था कायदेशीररित्या चालणार नसेल, तर हे हास्यास्पद आहे. पर्याय दिलेच नाही, असे म्हणतात. इलेक्शन कमिशन असं खोट कसं बोलू शकतं? हा निर्णय शरद पवारांना संपण्यासाठीच होता, पण महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना किती दुखावल्या गेल्यात हे आयोगाला माहित नाही” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘जो शरद पवारांच्या मरणाची प्रार्थना करतो, तो काहीही करु शकतो’
“84 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला, मी त्यांना म्हाताराच म्हणतो, ते म्हणत असतील मी जवान आहे. 84 वर्षाच्या एका माणसाला संपवण्यासाठी इतकी राजकीय ताकत खर्ची करणं, त्यांना मरणासन्न यातना देणं, हे अजित पवार कंपनीला शोभत नाही” अशी बोचरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. अजित पवार पक्ष कार्यालय ताब्यात घेणार असं बोलल जातय. त्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “त्यांना जे करायच ते करु दे. जो शरद पवारांच्या मरणाची प्रार्थना करतो, तो काहीही करु शकतो” अशा शब्दात आव्हाडांनी टीका केली.