मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. विधानसभेत आज (30 नोव्हेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. हा ठराव जिंकल्यामुळे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजप आमदार राम कदम (Pratap sarnaik and ram kadam meet) यांना पेढा भरवत गोड बातमी दिली.
विधानसभा निकालानंतर भाजपसोबतची युती तोडून शिवसेनेने थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत जाऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत मोठी दरी निर्माण झाली आहे. याच दरम्यान प्रताप सरनाईकांनी राम कदमांना (Pratap sarnaik and ram kadam meet) पेढा भरवत गोड बातमी दिल्याने त्यांच्या फोटोची चर्चाही सर्वत्र सुरु झाली आहे.
विधानसभेत आज महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास झाले आहे. महाविकासआघाडीच्या बाजून 169 सदस्यांची मतं पडली. त्यामुळे त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. यादरम्यान 4 सदस्य तटस्थ राहिले.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी हा विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला नवाब मलिक, सुनिल प्रभू, जयंत पाटील या तिन्ही नेत्यांनी अनुमोदन केले.