MVA Seat Sharing : उद्धव ठाकरेंना भेटण्याआधी बाळासाहेब थोरात यांचं महत्त्वाचं वक्तव्य

| Updated on: Oct 22, 2024 | 11:56 AM

MVA Seat Sharing : महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागावाटपाच्या चर्चेच गुऱ्हाळ सुरु आहे. आमच्यात मतभेद, वाद नाहीत, असा महाविकास आघाडीकडून वारंवार सांगितल जातय. आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाण्यााआधी त्यांनी काही महत्त्वाची वक्तव्य केली आहेत.

MVA Seat Sharing : उद्धव ठाकरेंना भेटण्याआधी बाळासाहेब थोरात यांचं महत्त्वाचं वक्तव्य
balasaheb thorat
Follow us on

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीय. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये विदर्भातील काही जागांवर मतभेद आहेत. मागच्या आठवड्यात रमेश चेन्नीथला यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याच दिवशी दुपारनंतर मविआच्या नेत्यांमध्ये जवळपास 10 तास चर्चा झाली. पण जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. महायुतीमध्ये भाजपाने 99 जागांवर उमेदवार जाहीर करुन आघाडी घेतली. पण महाविकास आघाडीमध्ये अजून चर्चाच सुरु आहेत. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात मतभेद झाले होते. त्यामुळे काँग्रेसने आता बाळासाहेब थोरात यांच्याकडे चर्चेची जबाबदारी सोपवली. त्यानुसार बाळासाहेब थोरात यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीनंतर बाळासाहेब थोरात माध्यमांशी बोललो. “नाना पटोले यांना हटवून, मला चर्चेसाठी नेमलय असं काही नाहीय. समन्वयक असं वेगळ पद आमच्यात नाही. आम्ही सर्वांनी एकमताने विचार केला. कोणीतरी जाऊन आदरणीय पवार साहेबांबरोबर चर्चा केली पाहिजे. चेन्नीथला म्हणाले, तुम्ही जा, म्हणून मी आलो. चागंली चर्चा झाली. मार्ग निघत आहे. काही राहिलेल्या जागांवर चर्चा सुरु आहे”

‘याचा अर्थ वाद असा होत नाही’

जागा वाटपाचा वाद कधीपर्यंत सुटेल, यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, “वाद नाही, चर्चा आहे. मविआमध्ये प्रत्येक पक्षाला जागांसाठी आग्रह धरण्याचा अधिकार आहे. मविआकडे चांगले उमेदवार आहेत. त्यामुळे आग्रह वाढतो, याचा अर्थ वाद असा होत नाही. आम्ही लवकरात लवकर मार्ग काढू. आता उद्धव ठाकरे यांना भेटायला जात आहे. त्यांच्यासोबत चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. बहुतांश जागांवर मार्ग निघालाय, थोड्या जागा शिल्लक आहेत. आज दुपारी 3 वाजता महाविकास आघाडीची बैठक आहे. जागा वाटप शक्य तितक्या लवकर जाहीर करु”