संजय राऊत यांना जामीन मिळताच एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जल्लोष; पेढे वाटले अन् फटाकेही फुटले

| Updated on: Nov 09, 2022 | 4:14 PM

राऊत यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी होणार असल्याने या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

संजय राऊत यांना जामीन मिळताच एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जल्लोष; पेढे वाटले अन् फटाकेही फुटले
संजय राऊत यांना जामीन मिळताच एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जल्लोष; पेढे वाटले अन् फटाकेही फुटले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणे: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. त्यामुळे राऊत यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राऊत यांना जामीन मिळाल्याने एकच जल्लोष करण्यात येत आहे. राऊत यांना जामीन मिळाल्याने कोर्टातही टाळ्या वाजवण्यात आल्या. त्यावर कोर्टाने नाराजीही व्यक्त केली. राज्यभर राऊत यांना जामीन मिळाल्याचा जल्लोष सुरू आहे. ठाकरे गटाने तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात फटाके फोडत आणि पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला.

ठाण्यातील तीन हात नाका येथे उद्धव ठाकरे गटाकडून प्रचंड जल्लोष करण्यात आला. संजय राऊत यांना जामीन मिळाल्याचा आनंद ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. राऊतांचे कट्टर समर्थक तुषार रसाळ यांच्या माध्यमातून हा जल्लोष करण्यात आला. यावेळी रसाळ आणि राऊत समर्थकांनी पेढ्यांचं वाटप केलं. तसेच फटाके फोडून जोरदार जल्लोष व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच ठाकरे गटाने जल्लोष केल्याने त्याला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे.

हे सुद्धा वाचा

राऊत यांचा जामीन मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्रभर शिवसैनिक जल्लोष करताना दिसत आहे. तर दुसरीकडे भांडुप येथील राऊतांच्या मैत्री निवासस्थानी जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे. राऊतांच्या निवासस्थानी एलईडी लावण्यात आलेली आहे.

या एलईडीवर शिवसेना खासदार संजय राऊत साहेब यांचे हार्दिक स्वागत अशा प्रकारचा मजकूर लावण्यात आला आहे. त्याचबरोबर लाईटिंग देखील करण्यात आलेली आहे. आज राऊत कुटुंबीयांसाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा क्षण असून राऊतांच्या घरी जणून दिवाळी साजरी होणार आहे.

राऊत यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी होणार असल्याने या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

जळगावमध्येही महापालिकेसमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राऊत यांना जामीन मंजूर झाल्याने जल्लोष साजरा केला. फटाके फोडून व ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत, फुगडी खेळत कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला आहे.

नागपुरातही हातात मशाल घेऊन आणि बँडच्या तालावर ठेका धरत, जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील शिवसेना संघटन बांधणीची जबाबदारी संजय राऊत यांच्यावर आहे. त्यामुळे जामिन मिळताच नागपुरात जल्लोष करण्यात आलाय.