NCP : राष्ट्रवादी-भाजपात काही जुळता जुळता जुळतंय? अजित पवारांनंतर जयंत पाटलांचीही भाजपला क्लिनचीट, बंडामागे हात नसल्याचं वक्तव्य

| Updated on: Jun 23, 2022 | 7:55 PM

एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप असल्याचं अजून तरी दिसत नाही, असं अजित पवार म्हणाले. अजितदादांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनीही शिंदेंच्या बंडामागे भाजप दिसून येत नाही, असं म्हटलंय.

NCP : राष्ट्रवादी-भाजपात काही जुळता जुळता जुळतंय? अजित पवारांनंतर जयंत पाटलांचीही भाजपला क्लिनचीट, बंडामागे हात नसल्याचं वक्तव्य
अजित पवार, जयंत पाटील
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा आरोप करण्यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांनी केलाय. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला क्लीन चिट दिल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप असल्याचं अजून तरी दिसत नाही, असं अजित पवार म्हणाले. अजितदादांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील (Jayant Patil) यांना प्रश्न विचारला असता त्यांनीही शिंदेंच्या बंडामागे भाजप दिसून येत नाही, असं म्हटलंय. त्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांनी भाजपला क्लीन चिट दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

अजितदादा म्हणतात, अजून तरी तसं दिसत नाही

एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात आहे. भाजप ईडी आणि सीबीआयचा दबाव टाकून आमदारांवर दहशत माजवत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जातोय. खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत पत्रकारांनी शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात आहे का? असा सवाल विचारला. त्यावेळी अजित पवार यांनी अजून तरी तसं वाटत नाही. आताच्या घडीला कोणत्याही भाजपचा नेता तिथं येऊन काही करतो हे दिसत नाही.. मोठा नेता, असं उत्तर अजित पवार यांनी दिलंय.

‘भाजपचे मोठे नेते यात कुठे दिसत नाहीत’

हा शिवसेनचा अंतर्गत मुद्दा नाही. भाजपचा यात कुठेही हात सध्या तरी दिसत नाही. तुम्ही प्रसारमाध्यमंच आम्हाला जे काही दाखवता त्यानुसार मला नाही वाटत त्यांनी काही केलेलं आहे. अजून तरी मला ते दिसलेलं नाही, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुमचं मत काय? त्यावर पाटील म्हणाले की, तुम्ही प्रसारमाध्यमं ज्यावेळी दाखवाल त्यावेळी आम्ही मत तयार करु. तुमच्याकडून अद्याप तशी कोणती माहिती आलेली नाही. भाजपने एखाद्या वेळी यांना फूस लावली, त्यांना घेऊन गेले, भाजपचे मोठे नेते यात कुठे दिसत नाहीत. त्यामुळे तसं पूर्ण माहितीशिवाय बोलणं योग्य ठरणार नाही.

‘फडणवीस त्यांच्या कामासाठी दिल्लीला गेले असतील’

विरोधी पक्षनेते दिल्लीला गेले. त्याचं ते केंद्र आहे, त्यांचा कामासाठी गेले असतील. तो त्यांच्या कामकाजाचा भाग असेल. अजून पर्यंत कुठेही भाजपचा हात दिसत नाही. एकनाथ शिंदेच स्वत: सर्व आमदारांना घेऊन गुजरातला गेले, सूतरेवरुन गुवाहाटीला गेले. त्यांना घेऊन जाण्यासाठी एवढ्या विमानांची जुळवाजुळव कुणी केली हे तुम्हीच आम्हाला सांगायचं आहे. मग आम्ही बोलायला सुरुवात करु, असंही जयंत पाटील म्हणाले.