मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपाचे सध्या मिशन इंडिया सुरू आहे, मिशन महाराष्ट्र सुरू आहे, महाराष्ट्रात बारामती येतेच असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्याचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बारामतीला धडका मारून काही उपयोग नाही, त्यापेक्षा भाजपाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. गेल्यावेळी माझ्याविरोधात ज्यांनी निवडणूक लढवली त्यांच्यासहित सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं. मतदारसंघातून दरवेळी लाखाच्या मताधिक्याने निवडून येतो. असा खोचक टोला अजित दादांनी लगावला आहे.
अजित पवारांनी भाजपच्या मिशन बारामतीचा यावेळी जोरदार समाचार घेतला आहे. बारामतीला धडका मारून काहीही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. गेल्यावेळी माझ्याविरोधात ज्यांनी निवडणुका लढवल्या त्यांचे डिपॉडझिट जप्त झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की, मी रोज सकाळी 6 ला कामाला सुरुवात करतो. मी माझ्या मतदारसंघात लाखाच्या मताधिक्याने विजयी झालो आहे. आपली ताकद मोठी आहे असं म्हणत अजित पवारांनी फडणवीसांना इशारा दिला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे सरकार स्थगिती सरकार आहे. सध्या विकास कामांना स्थगिती देण्याचे काम सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्ष चांगले काम केलं होतं. यांना कोणी खोके सरकार म्हटलं की राग येते असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.