पुणे: मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तूर्तास मागे घेण्यात आला आहे. मात्र या आरक्षणावरून आघाडीतच बेबनाव असल्याचं उघड झालं आहे. पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत आमनेसामने उभे ठाकल्याचं चित्रं आहे. आज या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार यांनी चिडून उत्तर दिल्याने पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून धुसफूस असल्याचं अधोरेखित झालं आहे. (ajit pawar reaction on cancellation of reservation in Promotion)
पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांना नितीन राऊत यांच्या विधानबाबत विचारण्यात आलं. त्यावर मला नितीन राऊत यांनी काय वक्तव्य केलं त्याबाबत माहीत नाही. जीआरबाबतही मला माहीत नाही. त्यांनी काय सांगितलं ते मला माहीत नाही, असं पवार चिडून म्हणाले. पवार चिडल्याचं पाहून पत्रकारही क्षणभर अवाक् झाले.
हायकोर्ट जो काही निर्णय देत असतं ते ऐकावं लागतं. पदोन्नतीतील आरक्षणाबाबत अजून अंतिम निर्णय आला नाही. कोणावरही अन्याय होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ. महाविकास आघाडीची भूमिकाही तीच आहे. सरकार दुर्लक्ष करतंय असं चित्रं होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेऊ, असंही ते म्हणाले.
दरम्यान, पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला 19 मे रोजी सरकारने तूर्तास स्थगिती दिली आहे. ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेतला. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयामुळे बराच वाद झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय स्थगित करण्यात आला. या निर्णयावरुन राज्य सरकारवर टीका होत होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले. राज्य सरकारने जीआर काढत आरक्षणाशिवाय सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला होता.
पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीला ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, सामाजिक न्याय विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्याम तागडे, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर उपस्थित होते. या बैठकीत राऊत यांनी 7 मेच्या जीआरबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनालाही धारेवर धरले होते. या जीआरला स्थगिती देण्यात यावी, अशी आग्रही मागणी करून समितीच्या निर्णयाशिवाय असे परस्पर विसंगत निर्णय का घेण्यात येतात? असा प्रश्न त्यांनी या बैठकीत केला होता. (ajit pawar reaction on cancellation of reservation in Promotion)
सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 21 May 2021 https://t.co/xFaiKk2Fhg #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 21, 2021
संबंधित बातम्या:
मोठी बातमी : पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय तूर्तास मागे, ठाकरे सरकारचा निर्णय
पदोन्नती कोट्यातील सर्व जागा भरणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
(ajit pawar reaction on cancellation of reservation in Promotion)