मुंबई : पाच दिवसीय हिवाळी अधिवेशन (Winter session) अखेर संपलं. अधिवेशनाचा समारोप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पाच दिवसांच्या अधिवेशनात किती विधेयकांवर काम झालं, याची माहिती तर दिलीच, शिवाय किती जणांना कोरोनाची (Corona) लागण अधिवेशनाच्या दरम्यान झाली, याबाबती अजित पवारांनी आकडेवारी सांगितली.
पाच दिवसांत विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात एकूण 28 विधेयकांवर काम झाल्याची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर त्यानं अधिवेशनाच्या पाच दिवस आमदार, मंत्र्यांसह एकूण 50 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. म्हणजेच सरासरी 10 प्रमाणे पाच दिवसात अधिवेशनातील एकूण कोरोना रुग्णसंख्या ही 50 वर पोहोचल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय.
50 जणांमध्ये आमदार, मंत्र्यांसह विधिमंडळातील कर्मचारी वर्गाचाही समावेश असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्वानीच काळजी घ्यायला हवी, असंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान, कोरोनाच्या सावटात घेतलेलं हे अधिवेशन म्हणून फक्त पाच दिवस घेतलं गेलं, असंदेखील अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलंय. भाजप आमदार समीर मेघे यांच्यासह अधिवेशनातील वेगवेगळ्या जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आज वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, विधानभवनातील वेगवेगळ्या कर्मचारी वर्गालाही कोरोनाचा संसर्ग झाला असून या रुग्णवाढीचा एकूण आकडा 50 वर गेल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय.
कोरोनाचा नवा व्हेरीएंट ओमिक्रॉनमुळे परदेशात रुग्णावाढ झाली आहे. ओमिक्रॉनची तीव्रता फार नसली, आणि मृत्यूदरही कमी असला, तरिही काळजी घेणं गरजेचं असल्यामुळेच पाच दिवस अधिवेशन घेतलं गेलं, असंही देखील अजित पवारांनी सांगितलं. दरम्यान अधिवेशन पाच दिवसांचं जरी असलं, तरी या अधिवेशनात 24 विधेयकं मंजूर करणयात आलं. प्रत्येक विधेयकाबाबत चर्चा झाल्याचाही दावा अजित पवारांनी यावेळी केली. दरम्यान, एकूण 28 विधेयकांवर अधिवेशना काम झालं, अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली. थोडासा गोंधळ झाला असेल, पण बऱ्यापैकी कामकाज व्यवस्थित पार पडलं, असं म्हणत अजित पवारांनी हिवाळी अधिवेशनाच्या पाच दिवसांच्या कामकाजाची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
-कोरोनाचे निर्बंध लावले गेले आहेत, ते खबरादारी म्हणून लावण्यात आले आहे. त्याचं काटोकोरपणे पालनं सगळ्यांनी करावं.
-अधिवेशनात जवळपास २४ विधेयकं मंजूर केली. एक विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आला आहे. एकूण 28 विधेयकांबाबत काम या अधिवेशनात झालं.
-शक्तिविधेयक हे अधिवेशनाताल ऐतिहासिक विधेयक होतं. कोकण दौऱ्यादरम्यान तृप्ती मुळीक यांनी माझ्या शासकीय गाडीचं काम केलं. आम्हाला माहितही नव्हतं की आमच्या गाडीच्या चालक एक महिला कर्मचारी आहे ते.. तृप्तीसारख्या अनेक महिन्या गावखेड्यात आहेत. आणि हीच आपली ताकद आहे. समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यासाठी शक्तिविधेयक महत्त्वाचं काम करेल.
-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत, यासाठी आम्ही एकमतानं निवडणूक आयोगाकडं मागणी करणार आहोत.
-चारशे पस्तीत कोटी रुपये इम्पिरिकल डेटासाठी मंजूर केले
-विदर्भाला ठरलेल्या टक्केवारीपेक्षा तीन टक्के रक्कम जास्त दिली
-आता 28 फेब्रुवारीला नागपुरात अधिवेशन घ्यायचं ठरलंय. त्या मधल्या काळात या सगळ्या अनुषंगानं शंका-कुशंका राहणार नाही
-बहुमताच्या जोरावर आम्ही कोणत्याही गोष्टी रेटू शकलो असतो, पण घटनेची कुठेही पायमल्ली झाली नाही पाहिजे, हे आम्हा तिन्ही पक्षांचं मत आहे.
-संपूर्ण अधिवेशनाच्या कामकाजात मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन केलं.