पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सपत्नीक पुण्यात दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही बारामती दौऱ्यावर आहेत. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार नाराज असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबाची बारामतीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Ajit Pawar Sharad Pawar Supriya Sule in Pune may discuss on Parth Pawar)
शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार सकाळी दहा वाजताच्या सुमारास मुंबईतील सिल्व्हर ओकमधील निवासस्थानाहून पुण्याला रवाना झाले. दुपारच्या सुमारास ते मोदी बागेतील निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर पवार दाम्पत्य बारामतीला जाण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या पुणे भेटीचा तपशील गुलदस्त्यात असल्याने नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पाहा व्हिडीओ :
शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांना जाहीर फटकारल्यानंतर कुटुंबात घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांची भूमिका काय आहे, याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. मात्र बारामती दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी पार्थविषयी बोलण्यास नकार दिला. मला कुणाशीही काही बोलायचं नाहीय. मला माझं काम करायचं आहे, असं बोलून ते निघून गेले.
अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून ते विविध विकासकामांची पाहणी करत आहेत. बारामती मतदारसंघातील विकासकामांची पाहणी करणे आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अजित पवार बारामतीत आहेत. विशेष म्हणजे पार्थ पवार प्रकरणानंतर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (Ajit Pawar Sharad Pawar Supriya Sule in Pune may discuss on Parth Pawar)
VIDEO : Ajit Pawar | ‘मला कुणाशीही काही बोलायचं नाही’ पार्थ पवारांविषयी बोलण्यास अजित पवारांचा नकार https://t.co/rRCstKenGa
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 16, 2020
श्रीनिवास पवारांच्या घरी बैठक
पार्थ पवार याची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत बंधू श्रीनिवास पवारांच्या घरी शनिवारी (15 ऑगस्ट) रात्री बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला पार्थ यांच्यासह अजित पवार, पार्थ यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार, काका श्रीनिवास पवार, काकी शर्मिला पवार, आजी आशाताई पवार असे सर्व जण उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
नया है वह, पार्थ पवारांबाबतचा प्रश्न छगन भुजबळांनी टोलावला
पार्थ पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते नाहीत, शरद पवारांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं : संजय राऊत
पवारांच्या नातवाच्या समर्थनार्थ पद्मसिंहांचा नातू मैदानात, पार्थ यांना फायटरची उपमा
(Ajit Pawar Sharad Pawar Supriya Sule in Pune may discuss on Parth Pawar)