सुनिल थिगळे, शिरुर, पुणे, दि. 17 फेब्रुवारी 2024 | लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर पवार कुटुंबियांच्या पुणे जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. बारामती बुथ मेळाव्यात अजित पवार यांनी शुक्रवारी भाषण केले. त्यात त्यांनी भावनिक भाषण केले. बारामतीमध्ये मी आणि माझा परिवार सोडला तर सर्व जण माझ्या विरोधात प्रचार करतील. मला एकटे पाडण्याचा प्रयत्न काही जण करतील, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यामुळे आता पवार अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राजकारणात सक्रीय झाल्याच्या दिसत आहेत. अनेक ठिकाणी त्या दौरे करत आहेत. शिरुरमधील शिक्रापूरमध्ये सुनेत्रा पवार चांगल्याच रंगल्या होत्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले सर्व लक्ष पुणे जिल्ह्याकडे केंद्रीत केले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघात पराभूत करणारच असल्याचे जाहीर आव्हान केले होते. अमोल कोल्हे यांनीही हे आव्हान स्वीकारले होते. त्यानंतर अजित पवार यांच्या कुटुंबियांकडूनही शिरूर लोकसभा मतदारसंघातील दौरे वाढले आहे. शिरुरमधील अनेक सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत आहे. सुनेत्रा पवार या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी घेतला अस्सल मराठी उखाणा#NCP #Pune #AjitPawar pic.twitter.com/jVEjU2S01R
— jitendra (@jitendrazavar) February 17, 2024
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिक्रापूर येथील महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. यावेळी त्या खेळ पैठणीचा ही खेळला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी उखाणा ही घेतला.
”महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून
अजितरावांचे नाव घेते तुमचे सर्वांचा मान राखून”
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उतरवण्याची शक्यता आहे. या जागेवर सध्या महायुतीच्या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. या जागेचा तिढा सुटण्याआधीच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बॅनरबाजी बाजी सुरु केली आहे.
हे ही वाचा
बारामतीत घरातील सर्व माझ्याविरोधात, मला एकटे पाडणार पण…अजित पवार कार्यकर्त्यांसमोर भावनिक