मुंबई : राज्यातील महापालिकेच्या निवडणूका (Election) तोंडावर आल्या आहेत. यामुळेच सर्वच राजकिय पक्ष कामाले लागले आहेत. अकोला महानगरपालिकेच्या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कारण ही विदर्भातील अत्यंत महत्वाची महापालिका आहे. सध्या अकोला महापालिकेत भाजपाची सत्ता असून हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इतकेच नाही तर अकोला महापालिकेवर (Municipality) आपली सत्ता मिळवण्यासाठी यंदा शिवसेना देखील मोठ्या उत्साहाने मैदानात उतरली आहे. अकोल्यातील लोकसंख्या 18,18,617 एवढी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या 9,36,226 एवढी असून महिलांची लोकसंख्या 8,82,391 इतकी आहे. अकोला महापालिकेत एकूण 91 जागा आहेत. त्यापैकी 46 जागा महिलांसाठी (Women) राखीव आहेत. 15 जागा अनुसूचित जातीसाठी आणि दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
अकोला महापालिका विदर्भातील अत्यंत महत्वाची महापालिका आहे. अकोला महापालिकेच्या एकूण 30 प्रभागातून 91 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. तर 29 प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. अकोला महापालिकेत भाजपची सत्ता आहे. यामुळे आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी यंदा भाजपालाही मोठी कसरत करावी लागणार हे नक्कीच आहे. तसेच राज्यातील राजकिय घडामोडींचा आणि सत्ता संघर्षाचा महापालिकेच्या निवडणूकीवर काय परिणाम होतो हे पाहण्यासारखेच ठरणार आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये काँग्रेसचे वर्चस्व बघायला मिळते. कारण प्रभाग क्रमांक 11 मध्ये सर्वच नगरसेवक हे काँग्रेसचे आहेत. प्रभाग क्रमांक 11 अ जैनबि शेख काँग्रेस, प्रभाग क्रमांक 11 ब शाहीन अंजुम काँग्रेस, प्रभाग क्रमांक 11 क जकाउल खान काँग्रेस, प्रभाग क्रमांक 11 ड जिशान हुसैन काँग्रेस हे नगरसेवक आहेत. पश्चिम- तुपे हनुमान मंदिराकडून येणारा रस्ता व मोर्णा नदीचे संगमापासून उत्तरेकडे मोर्णा नदीचे तिराने मुंबई कलकत्ता रेल्वेलाईनचे संगमापर्यंत. स्थळ ज्ञानेश्वर नगर, वानखडे नगर, जोगळेकर प्लॉट, साईनगर, शरीफ नगर, समत विद्यालय चा कॅम्पस, सैलानी नगर, भगतवाडी, नागेवाडीपर्यंत.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
मौजे अक्कलकोटची उत्तर हद्द व मुंबई कोलकत्ता रेल्वे लाईन यांचे संगमापासून पूर्वे कड़े रेल्वे लाईने आरपीटीएस चे दक्षिण पश्चिम कोप-या पर्यंत नंतर पुढे उत्तरेकडे आरपीटीएसचे पश्चिम हद्दीने व नंतर उत्तर हद्दीने पुढे गांव वाकापूरची उत्तर हद्द व मोर्णा नदीचे संगमापर्यंत गाँव वाकापूर उत्तर हह व मोर्णा नदीचे संगमापासून दक्षिणेकडे मोर्णा नदीचे तीराने नंतर शाह जुल्फीकार कब्रस्तान कडून येणारा रस्ता व मोर्णा नदीचे संगमापासून कब्रस्तानकडे जाणा-या रस्त्याने पश्चिमेकडे शाह जुल्फीकार कब्रस्तान पर्यंत तेथून पुढे कब्रस्तान समोरील दक्षिणेकडे नाला ओलांडून दक्षिणेकडे मनिदा किराणा शॉप पर्यंत नंतर पुढे पूर्वेकडे रस्त्याने तेपुल किराणा पर्यंत नंतर तेफुल किराणाचे पूर्वकाडील रस्त्याने दक्षिणेकडे नाल्यापर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे आहे.