AMC Election 2022 Ward 12 | अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपाचे वर्चस्व, पाहा प्रभागातील राजकिय समिकरणे…

| Updated on: Aug 16, 2022 | 6:13 AM

अकोला महापालिकेत भाजपची सत्ता आहे. यामुळे आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी यंदा भाजपालाही मोठी कसरत करावी लागणार हे नक्कीच आहे. तसेच राज्यातील राजकिय घडामोडींचा आणि सत्ता संघर्षाचा महापालिकेच्या निवडणूकीवर काय परिणाम होतो हे पाहण्यासारखेच ठरणार आहे.

AMC Election 2022 Ward 12 | अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपाचे वर्चस्व, पाहा प्रभागातील राजकिय समिकरणे...
Follow us on

मुंबई : महापालिकेच्या निवडणूका (Election) जवळ आल्याने निवडणूकांचे वारे वाहू लागले आहे. अकोला महानगरपालिकेच्या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कारण ही विदर्भातील अत्यंत महत्वाची महापालिका आहे. सध्या अकोला महापालिकेत भाजपाची सत्ता असून हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इतकेच नाही तर अकोला महापालिकेवर (Municipality) आपली सत्ता मिळवण्यासाठी यंदा शिवसेना देखील मोठ्या उत्साहाने मैदानात उतरली आहे. अकोल्यातील लोकसंख्या 18,18,617 एवढी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या 9,36,226 एवढी असून महिलांची लोकसंख्या 8,82,391 इतकी आहे. अकोला महापालिकेत एकूण 91 जागा आहेत. त्यापैकी 46 जागा महिलांसाठी (Women) राखीव आहेत. 15 जागा अनुसूचित जातीसाठी आणि दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.

भाजपा    
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

अकोला महापालिकेत भाजपची सत्ता

अकोला महापालिका विदर्भातील अत्यंत महत्वाची महापालिका आहे. अकोला महापालिकेच्या एकूण 30 प्रभागातून 91 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. तर 29 प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. अकोला महापालिकेत भाजपची सत्ता आहे. यामुळे आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी यंदा भाजपालाही मोठी कसरत करावी लागणार हे नक्कीच आहे. तसेच राज्यातील राजकिय घडामोडींचा आणि सत्ता संघर्षाचा महापालिकेच्या निवडणूकीवर काय परिणाम होतो हे पाहण्यासारखेच ठरणार आहे.

भाजपा    
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

क्रमांक 12 राष्ट्रवादी आणि भाजपाचे वर्चस्व

अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 राष्ट्रवादी आणि भाजपाचे वर्चस्व बघायला मिळते. प्रभाग क्रमांक 12 अ विजयी उमेदवाराचे नाव मध्ये जनव्ही डोंगरे भाजप, प्रभाग क्रमांक 12 ब हरीश अलिमचंदानी भाजप, प्रभाग क्रमांक 12 क उषा विरक राष्ट्रवादी, प्रभाग क्रमांक 12 ड अजय शर्मा भाजप असे निवडून आलेले नगरसेवक आहेत राष्ट्रवादी तिचा 1 नगरसेवक तर भाजपाचे 3 नगरसेवक निवडून आले आहेत.

भाजपा    
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

पाहा प्रभागची समिकरणे

गांव वाकापूर चे उत्तर व पश्चिम कोप-या पासून पूर्वे कडे वाकापूरच्या उत्तर हहीने मोर्णा नदीच्या संगमापर्यंत वाकापूरची उत्तर व मोर्णा नदीचे संगमापासून दक्षिणेकडे मोर्णा नदीच्या तीराने मोर्णा कैनाल कडून येणा-या नाल्याचे संगमापर्यत पूढे याच नाल्याने पश्चिमेकडे मोर्णा कैनाल पर्यंत पूढे दक्षिणेकडे मोर्णा कॅनाल रस्त्याने डाबकी रोड ओलांडून याच मोर्णा कॅनालने दक्षिणेकडे श्री गंगतीरे सर यांचे घरापर्यंत तेथून पुढे श्री गंगतीरे सराचे घराचे दक्षिणेकडील रस्त्याने पश्चिमेकडे श्री रामदास सरदार यांचे घरापर्यंत तेथून पुढे पूर्वेकडील रस्त्याने दक्षिणेकडे श्री अरविंद श्रावणजी भिरड यांचे घरापर्यंत तेथून पुढे श्री भिरड यांचे घरासमोरील रस्त्याने पूर्वेकडे हरिओम जेन्टस पार्लरपर्यंत तेथून पुढे मोर्णा कॅनाल रस्त्याने दक्षिणेकडे. प्रमुख प्रभाग आहे.