नाशिक : मनसे नेते अमित राज ठाकरे (Amit Raj Thackeray) आजपासून नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. आज दुपारपर्यंत ते नाशिकमध्ये पोहोचणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आढावा घेणार आहेत. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पुण्यात आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज आणि अमित ठाकरेंचा पुणे-नाशिक दौरा महत्त्वाचा आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे पक्षात चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. पक्षांतील नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन ते विविध विषय समजून घेत आहेत. त्यातच आता महापालिका निवडणुका असल्याने अमित यांचा अॅक्टिव्हनेस वाढलाय. त्यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिक दौरा केला होता. त्यानंतर आज पुन्हा ते नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत.
आज दुपारी नाशिक शहरात अमित ठाकरे यांचं आगमन होईल. त्यानंतर ते पक्षाती नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. त्यांच्याशी वन टू वन चर्चा करतील. शहरातील एकंदर राजकीय परिस्थिती तसेच विविध वार्डांची स्थिती, असा एकंदर आढावा घेऊन त्याचा अहवाल ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवणार आहेत.
अमित ठाकरे यांच्या नाशकामधल्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्यांनी नाशिक शहरात जातीने लक्ष घालायला सुरुवात केली आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने ते कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्या दृष्टीने तयारी करत आहेत. म्हणजेच अमित ठाकरेंवर नाशिक महापालिकेची जबाबदारी सोपविण्यात आली, अशी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Thane) यांची काल ठाण्यात पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. काल (मंगळवारी) सकाळी राज ठाकरे मुंबईवरुन 11.15 च्या सुमारास ठाण्याकडे रवाना झाले. तिथली बैठक आटपून राज ठाकरेंनी सायंकाळच्या सुमारास पुण्याच्या दिशेने कूच केलं.
राज ठाकरे 2 ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असतील. राज ठाकरे यांनी गेल्याच आठवड्यात पुणे दौरा केला होता. राज ठाकरेहे 19, 20 आणि 21 जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला होता. आठ दिवसांनी म्हणजे 30 जुलैला राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी दिली होती.
(Amit Raj Thackeray Will Visit Nashik Over Nashik Municipal Carporation Election)
हे ही वाचा :
बॅग भरुन कपडे आणा, राज ठाकरेंचे मुंबईतील पदाधिकाऱ्यांना आदेश, ठाण्यावरुन आजच पुण्याला निघणार
पुण्यातून निघण्यापूर्वीच राज ठाकरेंचा पुढचा दौरा ठरला, 8 दिवसांनी ‘मी पुन्हा येईन’!