नवी दिल्ली : ममतादीदी, ज्या ‘श्रमिक ट्रेन्स’ची तुम्ही ‘कोरोना एक्स्प्रेस’ अशा शब्दात थट्टा केली, तीच तुमच्या तृणमूल पक्षाचा ‘निर्गमन मार्ग’ ठरेल, अशी घणाघाती टीका गृहमंत्री अमित शाह यांनी केली. भाजपच्या व्हर्च्युअल मेळाव्यात शाह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर बरसले. (Amit Shah Criticises Mamata Banerjee ‘Corona Express’ will become your Exit Route)
“ममता दीदी, तुम्ही दिलेले ‘कोरोना एक्स्प्रेस’ हे नावच तुमचा ‘एक्झिट रुट’ होईल. तुम्ही स्थलांतरित मजुरांच्या जखमांवर मीठ चोळत आहात आणि ते ही गोष्ट विसरणार नाहीत’ असा इशारा भाजप कार्यकर्त्यांना ऑनलाइन संबोधित करताना अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांना दिला.
“ते (केंद्र सरकार) मजुरांनी भरलेल्या श्रमिक गाड्या भरुन नेत आहेत, तिथे कोणतेही सोशल डिस्टन्सिंग नाही, अन्न नाही, पाणी नाही. ते काय करण्याचा प्रयत्न करत आहेत? ते श्रमिक गाड्या चालवत आहेत की ‘कोरोना एक्सप्रेस’ चालवण्याचा प्रयत्न करत आहेत” अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली होती.
The name ‘Corona Express’ that you have given, Mamata didi, will become your exit route. You’ve added salt to the wounds of the migrant workers and they will not forget this: Shri @AmitShah #BanglarJanasamabesh pic.twitter.com/SqFd3TCdk1
— BJP (@BJP4India) June 9, 2020
“रेल्वे मंत्रालय व्हायरस विरुद्ध अधिक खबरदारी घेऊ शकलं असतं. मी रेल्वेमंत्री होते. मला माहिती आहे की आपल्याकडे पुरेशा बोगी आहेत. ते सहजपणे गाड्यांची लांबी वाढवू शकले असते आणि 48 तास अन्न-पाण्याविना असलेल्या लोकांची गाड्यांतील गर्दी रोखू शकले असते” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.
हेही वाचा : सत्तेच्या लालसेतून शिवसेनेकडून धोका, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार नव्हे, सर्कस : राजनाथ सिंह
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरु झाल्यापासूनच ममता बॅनर्जी आणि अमित शाह यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. कोरोनाविरुद्ध लढा देण्याच्या बंगाल सरकारच्या प्रयत्नांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ममता यांनी शाह आणि केंद्र सरकारमधील इतरांवर केला होता. भाजपने आपल्या राज्यात अवाजवी हस्तक्षेप केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. (Amit Shah Criticises Mamata Banerjee ‘Corona Express’ will become your Exit Route)