भाजप कार्यकर्त्याच्या घरी अमित शाहांचे जेवण, केजरीवाल म्हणतात…

| Updated on: Jan 25, 2020 | 4:06 PM

दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे नेते प्रचारामध्ये व्यस्त आहेत. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्लीत मतदान होणार आहे. त्यामुळे मतदारांची मनधरणी करण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून वेगवगळ्या शक्कल लढवल्या जात आहेत.

भाजप कार्यकर्त्याच्या घरी अमित शाहांचे जेवण, केजरीवाल म्हणतात...
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah eating food at party worker home) यांनी शुक्रवारी दिल्लीत भाजप कार्यकर्ते आणि दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांच्या घरी जाऊन जेवण केलं. याबाबत अमित शाह यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती दिली. शाह यांनी ट्विटमध्ये कार्यकर्त्यांचे आभारही मानले. मात्र, या ट्विटला आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिलं.

“भाजप फक्त राजकीय पक्षच नसून एक परिवार आहे. या परिवारातील प्रत्येक सदस्य आमची ताकद आहेत. आम्हा सर्वांना एकत्र येऊन सशक्त भाजप-सशक्त भारत ही संकल्पना प्रत्यक्षात साकारायची आहे”, असा निर्धार अमित शाह यांनी ट्विटमार्फत केला.

“अमित शाहजी ज्या कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही जेवण केलं त्याला जरुर विचारा की गेल्या पाच वर्षात त्याच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी कुणी घेतली? 24 तास वीज कुणी दिली? तुम्ही महागाई वाढवली तरीही वीज, पाणी आणि बसचा प्रवास मोफत कुणी करुन दिला? ती सर्व माझी दिल्लीची माणसं आहेत. मी त्यांचा मोठा मुलगा आहे. मी त्यांची काळजी घेतली आहे. आम्ही सर्व दिल्लीचे 2 कोटी नागरिक एका परिवारासारखे आहोत. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन गेल्या पाच वर्षात दिल्लीत बदल केले आहेत”, असे केजरीवाल म्हणाले.

दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे नेते प्रचारामध्ये व्यस्त आहेत. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्लीत मतदान होणार आहे. त्यामुळे मतदारांची मनधरणी करण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून वेगवगळ्या शक्कल लढवल्या जात आहेत. दरम्यान, शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत तीन प्रचारसभा घेतल्या. यातील शेवटची सभा ही दिल्लीच्या यमुना विहार या भागात झाली. या सभेनंतर शाह यांनी भाजप कार्यकर्ते आणि दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांच्या घरी जाऊन जेवण केलं (Amit Shah eating food at party worker home).