सुरज मसूरकर, नवी मुंबई : मुंबई महापालिकेसह राज्यातील महत्वाच्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अॅक्शन मोडमध्ये आलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) मैदानात उतरले आहेत. अमित ठाकरे यांच्या हस्ते आज नवी मुंबईत (Navi Mumbai) मनसेच्या 3 शाखांचे उद्घाटन करण्यात आलं. तसंच ‘शिवजनसंपर्क अभियानाला’ सुरुवात करण्यात आलीय. यावेळी वृक्षारोपण आणि ते वृक्ष दत्तक घेणं, वाचनालयाला भेट देणं आणि महिला सफाई कामगारांना रेशन कीट देनं असे विविध उपक्रम यावेळी राबवण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येनं महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी संपूर्ण परिसर मनसेमय झाला होता. महाराष्ट्र सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी अमित ठाकरे यांच्यासोबत सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. 19 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या शिवजनसंपर्क अभियानाला सुरुवात झाली. या अभियाना अंतर्गत नवी मुंबईकरांशी भेटून संवाध साधणार आहोत. या संवादातून नवी मुंबईकरांच्या आणि शहराच्या विकारासाठी विचार, सूचना आणि दृष्टीकोन जाणून घेणार असल्याचं मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटलं.
नवी मुंबई शहराध्यक्ष श्री. गजानन काळे, उपशहर अध्यक्ष श्री. नीलेश बाणखिले, श्री. प्रसाद घोरपडे, सचिव श्री. सचिन कदम, श्री. विलास घोणे, श्री. सचिन आचरे, महिला उपशहर अध्यक्षा सौ. अनिथा नायडू, सौ. सोनिया धनाके यांच्यासह अनेक पदाधिकारी व मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 20, 2022
पक्षाचे नवी मुंबई शहराध्यक्ष श्री. गजानन काळे, शहर सचिव श्री. विलास घोणे, महिला उपशहरअध्यक्षा सौ. अनिता नेटके-नायडू यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.#मनसे_मनामनांत #MNSAdhikrut
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 20, 2022
27 फेब्रुवारी हा मराठी भाषेचा गौरव दिवस जोशात आणि दिमाखात साजरा करा असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला आहे. तसंच एक पत्रच मनसेच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आलं आहे. ‘आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे. त्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला आयोजित करता येतील. हे इतक्या जोरदारपणे राजरे करा की तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की आज ‘मराठी भाषा गौरव दिवस’ आहे. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील ते पहा. तो जेवढा भव्य करता येईल तितका तो करा. त्यात मराठी भाषेचं पावित्र्य राखा, अशी सूचना राज ठाकरे यांनी केलीय.
#राजभाषा_मराठी #अभिजात_मराठी #मराठी_भाषा_गौरव_दिवस pic.twitter.com/3nCr4VDuGG
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 20, 2022
इतर बातम्या :