….म्हणून भाजप नेत्यांकडून शिवरायांबद्दल चुकीचे उद्गार, अमोल मिटकरी यांनी काय सांगितलं कारण?

| Updated on: Dec 09, 2022 | 11:38 AM

गोध्रा हत्याकांड आणि महाराष्ट्रातले उद्योग पळवल्यामुळे जसा गुजरातला फायदा झाला तसा फायदा मराठी माणसांवर हल्ले करून कर्नाटक मोहिमेमध्ये फायदा होईल, असा आरोप मिटकरी यांनी केला.

....म्हणून भाजप नेत्यांकडून शिवरायांबद्दल चुकीचे उद्गार, अमोल मिटकरी यांनी काय सांगितलं कारण?
Follow us on

सोलापूरः राज्यातील शेतकरी (Maharashtra Farmers) संकटात आहे. पण राज्य सरकारला शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यात फार रस नाही. त्यामुळेच छत्रपती शिवरायांवर (Chatrapati Shivaji Maharaj) भाजप नेत्यांकडून वारंवार चुकीची वक्तव्य करून जनतेचं लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि इतर काही मंत्र्यांनी केलेली वक्तव्य याच मालिकेतील असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. सोलापूरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण महोत्सवात केलेल्या वक्तव्याचाही अमोल मिटकरींनी खरपूस समाचार घेतला. एकनाथ शिंदेंना अजूनही माहिती नाही की आपण मुख्यमंत्री आहोत..

समृद्धी महामार्गाच्या पाहणी वेळेस स्टेअरिंग फडणवीसांच्या हातात होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस ज्या ज्या वेळी मुख्यमंत्री पदावर होते, त्या त्या वेळी राज्यातील शेतकरी वाऱ्यावर सोडला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

याबद्दल जनजागृती व्हावी म्हणूनराज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मिळाव्याचं आयोजन केल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली.

राज्यात दिवसेंदिवस ‘गोवर’च संकट वाढत आहे. सध्याचा आरोग्यमंत्री कोण आहे हे मला माहिती नाही, अशा शब्दात मिटकरी यांनी टीका केली. तर कोरोना काळातील राजेश टोपे यांच्या कामाशी त्यांनी तानाजी सावंत यांची तुलना केली.

आरोग्यमंत्री तानाजी सवंतांना हाफकिन माहिती नाही, गोवरचा प्रादुर्भाव कसा टाळावा हे माहिती नाही, असे मिटकरी म्हणाले.
राज्यातील शेतकरी संकटात असताना त्या मुद्द्याला विचलित करण्यासाठी भाजपातील नेत्यांकडून शिवरायांवर जाणीवपूर्वक चुकीचे विधान केले जातात..

राज्यपाल,मंगलप्रभात लोढा, सुधांशु त्रिवेदी, पडळकर, प्रसाद लाड ही लोक शिवाजी महाराजांच्या विषयाला हात घालून मुद्दे भरकटवत आहेत, असा आरोप मिटकरी यांनी केला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जाणीवपूर्वक सिमवादाचा प्रश्न उकरून काढलाय. गोध्रा हत्याकांड आणि महाराष्ट्रातले उद्योग पळवल्यामुळे जसा गुजरातला फायदा झाला तसा फायदा मराठी माणसांवर हल्ले करून कर्नाटक मोहिमेमध्ये फायदा होईल…

पण बसवराज बोम्मईने लक्षात घ्यावं अक्कलकोट, जत, सांगोला भागातील गाव ही महाराष्ट्रातच राहणार.. कारण हा महाराष्ट्र जगला तर देश जगेल, असा इशारा मिटकरी यांनी दिला.