मुंबई : अमरावती महापालिकेच्या (Amravati Municipal Corporation) निवडूका तोंडावर आल्या आहेत. अमरावती महापालिकेतील नगरसेवकांची सदस्य संख्या एकून 98 आहे. दरवेळीच अमरावती महापालिकेची निवडणूका (Election) चर्चेची होते. 98 मध्ये अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी दोन आणि महिलांसाठी 39 जागा राखीव आहेत. महापालिकेत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यापैकी 32 प्रभाग हे तीन सदस्यीय आहेत. तर एक प्रभाग दोन सदस्यीय आहे. अमरावतीची (Amravati) लोकसंख्या एकूण 6,47,057 एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1,11,435 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 15,955 एवढी आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असून डॉ. प्रवीण आष्टीकर हे पालिका आयुक्त म्हणून कार्यभार पाहत आहेत. डॉ. प्रवीण आष्टीकर हे या अगोदर पिंपरी-चिंचवड महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत होते. शिवाय महापालिकेत आयुक्त प्रवीण आष्टीकर आणि आमदार रवी राणा यांच्यामधील वाद संपूर्ण राज्याने बघितला आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
अमरावती महापालिकेत अगोदर 21 प्रभाग होते. मात्र, आता 33 प्रभाग करण्यात आले आहेत. यामुळे नव्या प्रभागात नव्या उमिदिने अनेकजण कामाला लागले आहेत. अमरावती महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने नव्या वाॅर्डामधून भाजपाचेच तिकिट मिळवण्यासाठी अनेकांनी अगोदर सेटिंग लावल्याचे देखील चित्र आहे. मात्र, पक्षाने तिकिट देऊ किंवा नाही आम्ही निवडणूक लढणार असे अनेकांनी ठरवले आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
प्रभाग क्रमांक 33 ची लोकसंख्या 14215 आहे. आठवडी बाजार व्याप्ती झाडीफल, आठवडी बाजार परिसर, सिंधी कॅम्प, इंदिरा नगर, लकडगंज परिसर, शिरमाते लॉन, नारायण नगर, मधुचंद्र कॉलनी, गजानन नगर, पवन नगर इत्यादी भाग हा प्रभाग क्रमांक 33 मध्ये येतो तर उत्तरेकडे मनपा बडनेरा झोन कार्यालय जवळील चौकापासून पूर्वेस बडनेरा विश्रामगृहाच्या ईशान्य कोप-यापर्यंत. बडनेरा विश्रामगृहाच्या ईशान्य कोप-यापासून दक्षिणेस राजेश्वरी विद्यालयाच्या कोप-यापर्यंत तेथून पूर्वेस पाण्याच्या टाकीपर्यंत तेथून दक्षिणेस वरुडा गावाजवळील नालापुलापर्यंत तेथून पश्चिमेस यवतमाळ रोड जंक्शनपर्यंत प्रभाग आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
अमरावतीची लोकसंख्या एकूण 6,47,057 एवढी आहे. मागील निवडणुकीत 4 वॉर्डाचा एक प्रभाग होते. आता तीन वॉर्डांचा एक प्रभाग असणार आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 33 मधून तीनच नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात उभं राहण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या वाढणार आहे.