तुम्ही कुणाला टाळी देणार? अमृता फडणवीस यांचा प्रश्न, राज ठाकरे यांचं रोखठोक उत्तर

| Updated on: Apr 26, 2023 | 9:23 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची आज मुलाखत घेतली. यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना आगामी काळात कुणासोबत युती करणार? असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली.

तुम्ही कुणाला टाळी देणार? अमृता फडणवीस यांचा प्रश्न, राज ठाकरे यांचं रोखठोक उत्तर
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘लोकमत’च्या पुरस्कार सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी अमृता फडणवीस यांनी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी किंवा भाजप पक्षाची म्हणून इथे आलेलो नाही, असं अमृता फडणवीस यांनी मुलाखतीच्या आधी स्पष्ट केलं. यावेळी अमृता फडणवीस यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींशी संबंधित अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारले. त्यावर राज ठाकरे यांनीदेखील मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली.

अमृता फडणवीस : तुम्हाला बघितलं की हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. तोच करिष्मा, तोच दबदबा, बोलण्याची तीच लय, मला वाटतं लहानपणापासून बाळासाहेबांचे आवडते होता. शिवसेना पक्षाची धुरा राज ठाकरे यांच्या हातात असली तर वेगळी असू शकली असती. कारण शिवसेनेचे 40 जण आज दुसऱ्यासोबत निघून गेले. आपल्याला काय वाटतं?

राज ठाकरे : पोलीस व्हॅनध्ये पोलीस घेऊन जातात तेव्हा आपली मनाची जी परिस्थिती तशी माझी मनाची परिस्थिती सध्याची अवस्था झाली आहे. मला दिवार चित्रपटाचा डायलॉग आठवतो. मेरे साथ भाई बोल रहा या इन्सपेक्टर की भेस मे मेरा भाई बोल रहा है. मी त्या विषयाला बंद करुन टाकलं आहे. जे झालंय ते सगळं आपल्यासमोर आहे. जे सांभाळत आहेत ते सांभाळत आहेत. मी एक पक्ष स्थापन केलाय. माझं मला माहिती आहे. मला बाकी काही कुणाचं घेणंदेणं नाही.

हे सुद्धा वाचा

अमोल कोल्हे : तुम्ही मीडिया हॅण्डल करण्याचं स्किल कसं आत्मसात केलं?

राज ठाकरे : मी असं काही आत्मसात केलेलं नाही. मला जे बोलायचं असतं ते मी बोलत असतो. मध्यंतरी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबद्दल वाद झाला होता. मी त्यावेळी काहीच बोललो नव्हतो. पण नंतर तो वाद झाला. इतक्या मोठ्या कलावंताला स्वत:च्या राज्याबद्दल प्रेम असेल तर राज ठाकरे तर फार छोटा माणूस आहे. त्याला आपल्या राज्याबद्दल वाटत नसेल का? मी मोकळेपणाने बोलतो. तुम्ही जेवढा माझ्या भाषणाचा विचार करता तेवढा मी करत नाही.

अमृता फडणवीस : राजकारणी मंडळी खूप खालच्या स्तरावर जाऊन एकमेकांवर टीका करत आहेत. याला लोकं कंटाळले आहेत. यात मीडिया पुढाकार घेऊ शकते, असं तुम्हाला वाटतं का? नॉटी लोकांच्या घरी जाऊन प्रतिक्रिया घणे बंद केलं पाहिजे का?

राज ठाकरे : मी यावेळी अनेकदा बोललोय की तुम्ही दाखवताय म्हणून ते बोलत आहेत. तुम्ही हे बंद केलं पाहिजे. पण त्यांचा शेवटी टीआरपीचा विषय असतो. मी टीआरपीचं काही करु शकत नाही.

अमृता फडणवीस : राजकारणत खूप टाळी देणं आणि डोळे मारणं चाललं आहे. राहुल गांधी यांनी मोदीजींना मिठी मारली. मग डोळा मारला. अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या हातात माईक दिला आणि डोळा मारला. याबाबत आपला काय प्लॅन आहे?

राज ठाकरे : डोळे मारायचा काय प्लॅन? ज्या वयातल्या गोष्टी त्या वयात करायच्या असतात. त्यांच्या काही गोष्टी राहून गेल्या असतील. त्यामुळे ते आता करत आहेत.

अमृता फडणवीस : मला न्यूज चॅनलवरुन कळतं. तुम्ही कधी राष्ट्रवादीच्या जवळ दिसता, कधी शिवसेना तर तर कधी भाजपला टाळी देता. आता हम साथ साथ है कोणाबरोबर आणि केव्हा करणार?

राज ठाकरे : काय आता तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी म्हणून बोलत नाही आहातच. तर आता मी बोलूनच टाकतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही सध्या कोणाबरोबर आहेत तेच कळत नाही.

अमृता फडणवीस : ते खूप लॉयल आहेत

राज ठाकरे : कारण काय, ते पहाटेच गाडी घेऊन करुणाकडे जातात. मग तुम्हाला कित्येकदा पत्ता नसतो. कधीतरी ते शिंदेंबरोबर असतात. कधीतरी अजित पवारांचा चेहरा उतरलेला दिसतो. कुणाला भेटणं, बोलणं ही बातमी झालीय. राजकारणातला मोकळेपणा मीडियाने घालवला. त्या सगळ्या गोष्टींना अर्थ नाही. कुणी कुणाला भेटलं तर युती आणि आघाडी होत नसतात.