मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्गच्या जागेवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. आशिष शेलार यांच्या टीकेचा व्हिडीओ रिट्विट करत अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली (Amruta Fadnavis slams Thackeray government on Metro carshed).
“मंद बुद्धी, बहु गर्वी, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा?”, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे (Amruta Fadnavis slams Thackeray government on Metro carshed).
अल्प बुद्धी , बहु गर्वी – कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा ? #maharashtragovt #disaster https://t.co/qU7QB0w49h
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 3, 2020
आशिष शेलार नेमकं काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री महोदयांनी आरेच्या ऐवजी कांजूरला मेट्रोची कारशेड नेण्याचा निर्णय केला. त्याच वेळेला आम्ही म्हटलं होतं, राज्य सरकारचा यामागे कुहेतू दिसतोय. घोषणा झाली तेव्हाच प्रतिक्रिया देताना आम्ही स्पष्ट म्हटलं होतं. अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र यामुळे मुंबईकरांना त्रास होतोय. आज ज्या पद्धतीच्या गोष्टी समोर येत आहेत. त्यावेळेलासुद्धा सांगताना आम्ही म्हटले होते. मीठागर आयुक्त सॉल्ट कमिश्नरची परवानगी जागा नावावर करताना घेतली होती का?, असा सवालही आशिष शेलारांनी उपस्थित केला.
आज केंद्राच्या पत्रानं एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे. अहंकारी प्रवृत्तीनं घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांना त्याच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतोय. मेट्रोच्या विकासामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची कार्यपद्धती आहे. पहिल्यांदा लटकवणे, अडकवणे, जागा ट्रान्सफर करताना ज्या पद्धतीच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होती, ती केलेली दिसत नाही. मीठागर आयुक्तांची परवानगी घेतलेली दिसत नाही.
अडकवणे, जनतेला भटकवणे आणि चुकीची माहिती देऊन जनतेला भ्रमित करणे, असा यांनी निर्णय घेतला आहे. मेट्रोच्या प्रकल्पात माननीय उद्धव ठाकरेजींनी घेतलेला निर्णय हा लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे अशा पद्धतीचा कारभार आहे. मुंबईकरांच्या माथी दिरंगाई तुम्ही थोपवली आहे. यामध्ये राज्य सरकार सर्वस्वी दोषी असल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला होता