मुंबई : शिवसेनेत भूकंप येईल अशी ऑडिओ क्लिप आज व्हायरल झालीय. अनिल परबांच्याविरोधात सर्व मटेरीयल हे रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप मनसेच्या स्थानिक नेत्यानं केला होता. त्यावर शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. टीव्ही 9 मराठी ह्या क्लिपची पुष्टी करत नाही. पण ज्या दोन ते तीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यात त्यात, परबांच्याविरोधात जी ईडीनं कारवाई केली त्यावर कदम वाह वाह म्हणताना दिसत आहेत. एवढंच नाही तर प्रसाद कर्वे हा रामदास कदमांचा कार्यकर्ता एकाच वेळेस कदम आणि सोमय्यांच्या संपर्कात होता असंही दिसतंय. (Audio clip between Ramdas Kadam and Prasad Karve goes viral)
रामदास कदम– हॅलो कुठे आहे?
प्रसाद कर्वे – आहे दापोलीत आहे.
रामदास कदम– आला का किरीट सोमय्या आला?
प्रसाद कर्वे – हो आलाय.
रामदास कदम – मग तु कधी येणार आहे त्याला घेऊन?
प्रसाद कर्वे – तो मला त्याचा कार्यक्रम संपला की फोन करणार आहे.
रामदास कदम– पण मग तिथून निघताना मला फोन लाव.
प्रसाद कर्वे – हो लावतो.
रामदास कदम – म्हणजे मी इथं कुणाला थांबवणार नाही ना
प्रसाद कर्वे – हो चालेल चालेल.
रामदास कदम– कालची मिटिंग छान झाली ना?
प्रसाद कर्वे – हो छान झाली, छान झाली.
रामदास कदम – त्याला समजतच नाही कधीही घोड्यावर येतो
प्रसाद कर्वे – अहो काही नाही ओ… गैरसमजुतीतून ते झालं म्हणून मी तुमच्या मागे लागलो होतो, बाकी काही नाही.
रामदास कदम – हो… हो… पण त्याला समजायला नको. त्याने एक फोन लावला होता. विचारला नको? असं कसं…
प्रसाद कर्वे – मी त्यांना घटना घडली तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही डायरेक्ट भाईंना फोन लावा.
रामदास कदम – आता काल त्याला कळलं असेल ना…
प्रसाद कर्वे – हो कळलं कळलं कळलं…
रामदास कदम – हे बदमाश आहेत बाकीचे… त्याला बाजूला करायचं आहे ना सगळ्यांना. ते मी आता होऊ देणार नाही. मी काल बघितलं यांचं सगळं. मी ज्या स्टाईलने बोललो ते लक्षात आलं असेल त्यांच्या सगळं. बोलून घेतलं मी काल जे बोलायचं होतं ते. तू मला फोन लाव पण निघताना हा…
प्रसाद कर्वे – हो फोन लावतो…
रामदास कदम – हॅलो…
प्रसाद कर्वे – भाई प्रसाद बोलतो
रामदास कदम – हा बोल
प्रसाद कर्वे – महावितरणलाही त्याने कागद दिले आहेत. त्याच्या नावाने कनेक्शन घेतलंय.
रामदास कदम – काय बोलला?
प्रसाद कर्वे – महावितरणचं कनेक्शन घेतलंय त्याने… अनिल परबच्या नावाने
रामदास कदम – हो ना…
प्रसाद कर्वे – हो. तुम्हाला पाठवलंय बघा.
रामदास कदम – हो पण तो नाही बोलतो ना. माझा काही संबंध नाही बांधकामाशी म्हणतो.
प्रसाद कर्वे – विभा साठे उद्या येऊन फौजदारी गुन्हा दाखल करतोय पोलीस स्टेशनला. दोघांच्या विरुद्ध…
रामदास कदम – अॅफिडेव्हिट करायला पाहिजे त्यांनी..
प्रसाद कर्वे – हो केलं.. नोटरी केलं त्यांनी.
रामदास कदम – मग काही अडचण नाही.
प्रसाद कर्वे – त्याने नोटरी केली.. आता तो गुरुवारी येऊन फौजदारी गुन्हा दाखल करतोय. किरीट सोमय्या घेऊनच येतोय त्याला.
रामदास कदम – तो येईल, अडचणीत येईल. 100 टक्के अडचणीत येईल. मी येतो 23 ला संध्याकाळी…
प्रसाद कर्वे – हो हो.. ठिकय चालेल.
रामदास कदम– हॅलो
प्रसाद कर्वे- भाई ते अनिल परबचं कार्यालय तोडायची ऑर्डर झालीय
रामदास कदम – कुठलं कार्यालय
प्रसाद कर्वे- वांद्र्याचं कार्यालय होतं बघा, म्हाडाच्या दोन इमारतीमधलं.
रामदास कदम- वाह… व्हेरी गुड. व्हेरी गुड
प्रसाद कर्वे- लोकायुक्तांनी ऑर्डर दिलीय. एक महिन्याच्या आत बांधकाम पाडून टाकावं.
रामदास कदम- मग त्याच्यावर गुन्हाही दाखल होईल ना
प्रसाद कर्वे- हो गुन्हाही दाखल होणार.
रामदास कदम- गुन्हा दाखल झाला तर राजीनामा द्यावा लागेल मग
प्रसाद कर्वे- हो हो
रामदास कदम- गुन्हा दाखल झाला ना तर मग त्याला रिझाईन द्यावा लागेल ना.
प्रसाद कर्वे- होय होय…
रामदास कदम- असं काय
प्रसाद कर्वे- हो
रामदास कदम- व्हेरी गुड व्हेरी गुड… त्याची कॉपी आहे का तुझ्याकडे?
प्रसाद कर्वे– नाही. आज ऑर्डर झालीय. पण दोन दिवसांनी कॉपी मिळेल.
रामदास कदम- ओके ओके…
प्रसाद कर्वे- हां हां
रामदास कदम-ऑर्डर झाली तर अनधिकृत बांधकाम केलं म्हणून गुन्हाही दाखल करावा लागेल. एमआरटीपीच्या माध्यमातून गुन्हा होईल ना दाखल
प्रसाद कर्वे- हो हो, होईल ना… होईल ना… करणार आहे तो.
रामदास कदम- हम्म
प्रसाद कर्वे- किरीट सोमय्या करणार आहे.
रामदास कदम- ओके ओके ओके ओके
किरीट सोमय्या – अरे भाऊ, मध्यंतरी तू पाठवली होती ना लिस्ट ती परत पाठव. कारण मी आता आलोय अलिबागला. ती लिस्ट माझ्या ऑफिसमध्ये मुंबईला आहे.
प्रसाद कर्वे – हा पाठवतो पाठवतो.
किरीट सोमय्या – ती पूर्ण दापोली तालुक्याची आहे की…
प्रसाद कर्वे – पूर्ण दापोली तालुक्याची आहे.
किरीट सोमय्या – दापोली तालुक्यातील म्हणजे अंजर्ले, हरणे… समुद्र किनाऱ्यावरील गावची मुख्यत्वे.
प्रसाद कर्वे – सीआरझेडमधली… सीआरझेडमधली…
किरीट सोमय्या – कारण का ते दिल्लीवाले मागवतात ना माझ्याकडून
प्रसाद कर्वे – हो बरोबर बरोबर
किरीट सोमय्या – आता हे जे काढून दिले आहेत. ते म्हणतात ऐसा लिखा है हमको… आंख खुल गई.
प्रसाद कर्वे – (हसण्याचा आवाज)
किरीट सोमय्या – आणि आता जिल्हाधिकारीपण…
प्रसाद कर्वे – घाबरलाय…
किरीट सोमय्या – हा म्हणजे मी ते शब्द नाही वापरू शकत ना
प्रसाद कर्वे – बरोबर बरोबर
किरीट सोमय्या – जो गैरकानुनी है ओ गैरकानुनी रहेगा
प्रसाद कर्वे – बरोबर आहे बरोबर आहे
किरीट सोमय्या – अव उनको जवाब देना पडेगा. उद्या मी दापोलीला येणार आहे. चला बघुया. म्हणून ती लिस्ट पाहिजे होती.. मी बोललो ना
प्रसाद कर्वे – पाठवतो पाठवतो.
प्रसाद कर्वे – उनका अनिल परब का कार्यालय का निकाल लगा है ना? कार्यालय म्हाडा अनधिकृत कार्यालय
किरीट सोमय्या – हो हो.. लागला…. त्याची ऑर्डर झाली. परवा हिअरिंगमध्ये … संपला की आपण जिंकलो. आणि म्हाडाने एका महिन्यात ….. करायचं मान्य केलं
प्रसाद कर्वे – अच्छा अच्छा अच्छा
किरीट सोमय्या – पण काय आहे… त्याची ऑर्डर जी असते ना ती साईन करुन येणार मग ती सोशल मीडियामध्ये टाकणार, मीडियाला देणार.
प्रसाद कर्वे – कळलं कळलं…
किरीट सोमय्या – ऑर्डर झाली डिक्टेट. म्हाडाने कारवाई सुरु केली. परंतु दोन दिवसांत येणार तर दोन दिवसांत काय फरक पडतोय.
प्रसाद कर्वे – काय नाही फरक पडत… बरोबर आहे.
किरीट सोमय्या – म्हणून मी मुद्दाम कमेंट करत नाही.
प्रसाद कर्वे – ठिकय ठिकय…
किरीट सोमय्या – पण झालं, त्याचं कार्यालय तोडायचा आदेश झाला.
विधानसभा निवडणुकीच्यावेळी देखील माझ्या आवाजाच्या ऑडिओ क्लीप बनवून व्हायरल करण्यात आल्या होत्या. त्या ऑडिओ क्लीपमध्ये मी मुस्लिम समुदायाला शिवीगाळ करत असल्याचा दावा करण्यात आला होता. गेल्या दोन महिन्यांमध्ये दहावेळा या विषयावर पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी मी अब्रुनुकसानीचा दावा टाकलेला आहे. प्रसाद कर्वेसोबत माझा कुठलाही संबंध नाही. किरीट सोमय्यांशी माझा कुठलाही संबंध नाही. उलटपक्षी जो मुलगा आहे तो वैभव खेडेकरांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. त्या दोघांनी मिळून हे केलं की काय? असं मला वाटत आहे. अनिल परब यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. मी शिवसेनेचा नेता आहे. त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. माझा मुलगा तिथे आमदार आहे. संजय कदम यांना पाडून तो आमदार बनलेला आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो. हे पाप आहे. ते माझ्या हातून घडणार नाही. खोट्या क्लीप व्हायरल करुन मला बदनाम करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले होते. रामदास कदम बोलल्यानंतर मोठी प्रसिद्धी मिळते.
याच्याआधीही माझी बदनामी झाल्याचा दावा मी ठोकलाय. आता पुन्हा मी न्यायालयात जाणार आहे. किरीट सोमय्या यांच्याशी आमचा दुरान्वयेही संबंध नाही. मी पाठीत खंजीर खुपसणारा नाही. विधानसभा निवडणुकीच्यावेळी देखील अशा क्लीप व्हायरल करुन बदनाम केलं गेलंय. मी दोनदा पत्रकार परिषदा घेऊन मंत्रीपद स्वीकारणार नाही, असं जाहीर केलं होतं. माझी कोणतीही नाराजी नाही. खोट्या क्लीप बनवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणावरुन मी कदाचित एक-दोन दिवसात उद्धव ठाकरे यांना भेटू, असं रामदास कदम म्हणाले. (Audio clip between Ramdas Kadam and Prasad Karve goes viral)
वैभव खेडेकर यांनी रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे यांच्या माध्यमातून अनिल परब यांच्या रिसॉर्टबाबत माहिती मिळवली. तसेच नंतर ती किरीट सोमय्या यांना पुरवली गेली असा गंभीर आरोप केलाय. यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “अनिल परब आणि हे प्रकरण समाज माध्यमांवर यापूर्वीच आलेलं आहे. आता या संदर्भातील संभाषण ते माझं नसल्याचं म्हणत असतील. तर त्याबाबत फॉरेन्सिक तपास करावा. दुसरी गोष्ट म्हणजे जे प्रसाद कर्वे नामक माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपल्या ऑडिओ क्लीप चोरीला गेल्याच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. दुसरीकडे हे म्हणतात की त्या ऑडिओ क्लीप माझ्या नाहीत. यातच सगळा गौडबंगाल आहे. किरीट सोमय्या कोकणात येऊन उद्योजकांवर माहितीचा अधिकार टाकतात, सर्व माहिती मिळवतात. त्यांना स्थानिकांची साथ असल्याशिवाय ते एवढी मोठी डेअरिंग करुच शकत नाहीत. म्हणून मला म्हणायचंय शिवसेना आणि भाजपमध्ये सख्य नाहीय. त्यामुळे या ज्या क्लिप समाजमाध्यमांवर येत आहेत त्यांच्यात काहितरी तथ्य आहे, असे वैभव खेडेकर म्हणाले आहेत.
तर दुसरीकडे प्रसाद कर्वे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. “खेड नगरपरिषदेच्या भ्रष्टाचाराबाबत नगराध्यक्षांनी जे घोळ केलेले आहेत, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. तो भ्रष्टाचार मी माहिती अधिकारात काढला. त्यांनंतर कायदेशीरपणे त्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नगरसेवकांद्वारे प्रस्ताव दिले. रामदास कदम आणि त्यांचे पुत्र कोट्यवधीचा निधी आणत असल्याने वैभव खेडेकर त्यांच्यावर वारंवार गंभीर आरोप करत आहेत. ज्यांनी त्यांना गुरु म्हणून राजकारणात उभं केलं त्यांच्याविरोधात त्यांचा पोटशूळ आहे,” असे प्रसाद कर्वे म्हणाले.
इतर बातम्या :
Photo : शरद पवार आमदार निलेश लंकेंच्या घरी, आई-वडिलांची विचारपूस; लंके कुटुंब भारावलं
Audio clip between Ramdas Kadam and Prasad Karve goes viral