मुंबई: कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. अनिल परब यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विधानपरिषदेच्या 12 जागांची आठवण करुन दिली. या सोबतच भाजपला चिमटे देखील काढले. थोडे दिवस थांबा कोण घाबरतंय हे कळेल. सरकारला घाबरण्याचं कारण नाही. आम्ही केलेली काम अधिवेशनात ठामपणे मांडू, असं अनिल परब म्हणाले. (Anil Parab Said Local Administration have powers to implement lockdown due to corona virus outbreak)
अकोला, यवतमाळ आणि अमरावतीमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यानं मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला उपाययोजना करण्याचे अधिकार दिले आहेत. तर, लॉकडाऊन करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. राज्यात कोरोना रुग्ण वाढत असून कडक नियम लागू करण्याची गरज आहे, असंही अनिल परब म्हणाले. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवशेन टप्प्या टप्प्यानं वाढवण्यात येईल. 25 फेब्रुवारीला बैठक घेण्यात येईल आणि त्याबाबत नि्र्णय होईल, अशी माहिती देखील अनिल परब यांनी दिली.
राज्यपालांचं पत्र आलेलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या रिक्त जागेवर निवडणूक घ्यावी, असं ते पत्र आहे. कॅबिनेटमध्ये कधी निवडणूक घ्यायची ते ठरवू आणि त्यांना कळवू. त्यांनी आम्हाला एका जागेची आठवण करुन दिली. राज्यपालांनी 12 जागांची घोषणा अधिवेशनापूर्वी होईल. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची तारीख ठरल्यानंतर राज्यपालांना काय कळवायचे ते कळवण्यात येईल.
अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. अमरावतमीध्ये 50 टक्के जास्त परिस्थिती पाहायला मिळाला. मुख्यमंत्री साडेबारा वाजता बैठक घेणार आहेत. त्यामध्ये काय निर्णय घ्यायचा याविषयी चर्चा होणार आहे. कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झालीय. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे.
लग्न कार्य महत्वाचं की कोरोनामध्ये माणसांना वाचवणं महत्वाचं आहे. जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर काय करायचं. मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचे आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं नियमांमध्ये शिथीलता आणली. कोरोना रुग्णसंख्या कमी होत चालली होती. जानेवारीच्या शेवटमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या कमी होती. कोरोना रुग्णांची संख्या कमी होती.
1 फेब्रुवारीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढली.
नागपूर विभागात नागपूर, वर्धा मध्ये रुग्ण वाढत आहेत. नाशिकमध्येही वाढत आहेत. अमरावती विभागात मुंबईपेक्षा जास्त रुग्ण वाढत होते. कोरोना नियमांना गांभीर्यानं घ्यावे.
संबंधित बातम्या:
मनसेकडून सविनय कायदेभंग करत मुंबईकरांसाठी लोकल प्रवास, सविनय कायदेभंग म्हणजे काय?
MNS protest | मनसेचा सविनय कायदेभंग, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास
(Anil Parab Said Local Administration have powers to implement lockdown due to corona virus outbreak)